Ollie Pope चा अनोख्या शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड, सचिनलाही जमलं नाही

| Updated on: Sep 07, 2024 | 12:22 AM

England vs Sri Lanka 3rd Test : ओली पोप याला पहिल्या 2 सामन्यात काही खास करता आलं नाही. मात्र ओलीने तिसऱ्या सामन्यात शतक ठोकलंय. ओलीचं हे शतक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरलंय.

Ollie Pope चा अनोख्या शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड, सचिनलाही जमलं नाही
Ollie Pope Century
Image Credit source: England Cricket X Account
Follow us on

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे खेळवण्यात येत आहे. इंग्लंडचा कॅप्टन ओली पोप याने सामन्यातील पहिल्या दिवशी श्रीलंकेविरुद्ध शानदार शतक ठोकलं आहे. ओली पोप याने डावातील 44 व्या ओव्हरमध्ये असिथा फर्नांडो याने टाकलेल्या 5 व्या बॉलवर चौकार ठोकून शतक पूर्ण केलं. ओलीने 102 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकार ठोकले. तसेच ओलीने या शतकी खेळीत 20 एकेरी, 5 दुहेरी आणि 3 तिहेरी धावा घेतल्या. तर ओलीने 59 बॉल डॉट केले. ओलीच्या कसोटी कारकीर्दीतील हे 7 वं शतक ठरलं. ओलीने या सातव्या शतकासह इतिहास रचला. ओलीने या शतकासह वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

ओलीचं ऐतिहासिक शतक

ओलीने कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या कारकीर्दीतील पहिली सातही शतकं वेगवेगळ्या संघांविरुद्ध झळकावण्याचा कारनामा केला आहे. ओलीआधी अशी कामगिरी कुणालाच जमली नाही. इतकंच काय, तर सचिन तेंडुलकरलाही असा कारनामा करता आला नाही. तसेच ओलीचं हे कर्णधार म्हणून पहिलंवहिलं शतक ठरलं. ओली बेन स्टोक्स याच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय. बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

7 शतकं 7 देश

ओली पोप याने कसोटी कारकीर्दीतील त्याचं पहिलंवहिलं शतक हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2020 साली झळकावलं होतं. ओलीने त्यानंतर न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, भारत, वेस्टइंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध शतक केलंय.

ओलीचं शतक, धावा आणि वर्ष

  • विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 135 नाबाद, 2020
  • विरुद्ध न्यूझीलंड, 145, 2022
  • विरुद्ध पाकिस्तान, 108, 2022
  • विरुद्ध आयर्लंड, 205, 2023
  • विरुद्ध भारत 196, 2024
  • विरुद्ध विंडिज, 121, 2024
  • विरुद्ध श्रीलंका, नाबाद 103, 2024

ओली पोपचं एकमेवाद्वितीय

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके आणि विश्वा फर्नांडो.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.