ENG vs SL : पाथुम निसांकाचं वनडे स्टाईल अर्धशतक, श्रीलंकेची आक्रमक सुरुवात

Pathum Nissanka Fifty: श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसांका याने इंग्लंड विरुद्ध विस्फोटक अर्धशतक ठोकलं आहे.

ENG vs SL : पाथुम निसांकाचं वनडे स्टाईल अर्धशतक, श्रीलंकेची आक्रमक सुरुवात
Pathum Nissanka Fifty
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 8:59 PM

श्रीलंकेने इंग्लंडला तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 325 धावांवर रोखलं. इंग्लंडने पहिल्या दिवशी 3 विकेट्स गमावून 221 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने दुसऱ्या दिवशी दणक्यात कमबॅक करत इंग्लंडला रोखण्यात यश मिळवलं. इंग्लंडला 325 धावांवर गुंडाळल्यानंतर श्रीलंकेने आक्रमक सुरुवात केली आहे. श्रीलंकेचा ओपनर पाथुम निसांका याने वनडे स्टाईल अर्धशतक झळकावत आक्रमकपणे खेळणार असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र याच आक्रमकपणामुळे श्रीलंकेला विकेट्सही गमवावे लागलं हे ही खरं आहे. पाथमु निसांका याने 12 व्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. निसांकाने जोश हल याच्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर चौकार ठोकून 40 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. निसांकाच्या कसोटी कारकीर्दीतील हे पाचवं अर्धशतक ठरलं.

पाथुमने अर्धशतकानंतर तडाखा सुरुच ठेवला, मात्र त्याला फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. पाथुमने 51 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 125.49 च्या स्ट्राईक रेटने 64 धावांची खेळी केली. पाथुमला जोश हल याने ख्रिस वोक्स याच्या हाती कॅच आऊट केलं. जोशने पाथुमला आऊट करत कसोटी कारकीर्दीतील पहिली विकेट मिळवली.

दरम्यान श्रीलंकेने आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात 100 धावांच्या आतच 5 विकेट्स गमावल्या. पाथुमनंतर दिनेश चांदीमल आऊट झाला. यासह श्रीलंकेचा अर्धा संघ माघारी परतला. श्रीलंकेची 16.2 ओव्हरमध्ये 5 बाद 93 अशी स्थिती झाली. त्यामुळे आता कॅप्टन धनंजया डी सिल्वा आणि कामिंदु मेंडीस या जोडीवर श्रीलंकेचा डाव सावरण्याची जबाबदारी असणार आहे.

पाथुमची चाबूक खेळी

श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पाथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रथनायके आणि विश्वा फर्नांडो.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.