ENG vs SL : मार्क वूडच्या जागी या खेळाडूचा समावेश, श्रीलंकेला टेन्शन

England vs Sri Lanka Test Cricket : इंग्लंड श्रीलंके विरूद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता उर्वरित मालिकेसाठी इंग्लंड टीममध्ये युवा खेळाडूची एन्ट्री झाली आहे.

ENG vs SL :  मार्क वूडच्या जागी या खेळाडूचा समावेश, श्रीलंकेला टेन्शन
england teamImage Credit source: Bcci
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 10:56 PM

इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज मार्क वूड याला दुखापतीमुळे श्रीलंके विरूद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. वूडच्या जागी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने युवा खेळाडूचा समावेश केला आहे. इंग्लंड टीममध्ये वूडच्या जागी जोश हल या 20 वर्षीय गोलंदाजाला संधी दिली आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. इंग्लड या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी (24 ऑगस्ट) श्रीलंकेवर 5 विकेट्सने विजय मिळवला.

मार्क वूड याला पहिल्या कसोटी सामन्यातली तिसऱ्या दिवशी दुखापत झाली. मार्क वूड याने श्रीलंकेच्या दुसऱ्या डावातील 11 वी ओव्हर टाकली. वूडला 2 बॉल टाकल्यानंतर मैदानाबाहेर जावं लागलं. त्यामुळे जो रुट याने उर्वरित 4 बॉल टाकले आणि ओव्हर पूर्ण केली. रुटने या दरम्यान मिलन रथनायके याला आऊट केलं. वूड इंग्लंडच्या अनेक मॅचविनर खेळाडूंपैकी एक आहे. आता वूडच्या जागी 6 फुट 7 इंच उंच खेळाडूला संधी दिली गेली आहे.

जॉश हल या 20 वर्षीय गोलंदाजाने देशातंर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जॉश लेस्टरशायरच्या आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक आहे. जॉशने 2023 साली लेस्टरशायरला वन डे 2023 कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. तसेच जॉशने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 62.75 च्या सरासरीने 16 विकेट्स घेतल्या आहेत. आता जॉशला श्रीलंके विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मार्क वूड आऊट, जोश इन

कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा सुधारित संघ : ऑली पोप (कॅप्टन), गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, जोश हूल, डॅनियल लॉरेन्स, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ऑली स्टोन आणि ख्रिस वोक्स.

टेस्ट सीरिजसाठी श्रीलंका टीम : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो, मिलन रथनायके, लाहिरू कुमारा, सदीरा समरविक्रमा, कसून रजिथा, पथुम निसांका, निसाला थाराका, जेफ्री वेंडरसे आणि रमेश मेंडिस.

सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.
काय सांगताय, केळीच्या खोडाच्या पावडरपासून बाप्पाची मूर्ती, बघा व्हिडीओ
काय सांगताय, केळीच्या खोडाच्या पावडरपासून बाप्पाची मूर्ती, बघा व्हिडीओ.
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं फसवलं; पगारवाढ 2020 पासून नाहीच, तर…
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं फसवलं; पगारवाढ 2020 पासून नाहीच, तर….
'हे मान्य नाही', शिवसेनेकडून मुंबईत बुरखा वाटपावर भाजपचा आक्षेप
'हे मान्य नाही', शिवसेनेकडून मुंबईत बुरखा वाटपावर भाजपचा आक्षेप.
भाग्यश्री आत्रामांचा आपल्या वडिलांनाच थेट इशारा, ‘…तर हात कापून टाकेन
भाग्यश्री आत्रामांचा आपल्या वडिलांनाच थेट इशारा, ‘…तर हात कापून टाकेन.
राणेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांकडून टीका तर महायुतीची नाराजी
राणेचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांकडून टीका तर महायुतीची नाराजी.
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.