ENG vs SL Test Series: कॅप्टन बेन स्टोक्स टेस्ट दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर, इंग्लंडला मोठा झटका
England vs Sri Lanka Test Cricket: इंग्लंड क्रिकेट टीमला कसोटी मालिकेआधी मोठा झटका लागला आहे. कॅप्टन बेन स्टोक्स याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे.
श्रीलंका टीम इंडियाला वनडे सीरिजमध्ये 2-0 ने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट टीम इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज आहे. श्रीलंका इंग्लंड दौऱ्यात एकूण 3 सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंका या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. या कसोटी मालिकेला बुधवार 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी इंग्लंड क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. इंग्लंडचा कॅप्टन आणि ऑलराउंडर बेन स्टोक्स हा हॅमस्ट्रींग दुखापतीमुळे या श्रीलंके विरूद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.
बेन स्टोक्सला दुखापतीच्या जाळ्यात
बेन स्टोक्स याला द हन्ड्रेड या स्पर्धेदरम्यान खेळताना दुखापत झाली. बेन स्टोक्स या स्पर्धेत नॉर्दर्न सुपरचार्जर्सचं प्रतिनिधित्व करत होता. रविवारी 11 ऑगस्ट रोजी नॉर्दर्न सुपरचार्जर्स विरुद्ध मॅनचेस्ट ओरिजिनल्स आमनेसामने होते. बेन स्टोक्सला या सामन्यादरम्यान बॅटिंग करताना हॅमस्ट्रिंगचा त्रास जाणवला. स्टोक्सला इतक्या तीव्रतेने वेदना होत होत्या की त्याला स्ट्रेचवरुन मैदानाबाहेर नेण्याच आलं. त्यानंतर वैद्यकीय पथक स्टोक्सवर लक्ष ठेवून होतं. मात्र बेन स्टोक्स कसोटी मालिकेआधी दुखापतीतून सावरण्याची चिन्हं नाहीत. त्यामुळे स्टोक्स कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं. स्टोक्सच्या जागी बदली खेळाडूचीही घोषणा करण्यात आलेली नाही.
इंग्लंडला तगडा धक्का
A hamstring injury has ruled out England Test captain Ben Stokes for the #WTC25 series against Sri Lanka.
More 👇https://t.co/9GXk03r0nN
— ICC (@ICC) August 13, 2024
टेस्ट सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 21-25 ऑगस्ट, मँचेस्टर.
दुसरा सामना, 29 ऑगस्ट- 2 सप्टेंबर, लॉर्ड्स.
तिसरा सामना, 6-10 सप्टेंबर, केनिंग्टन ओव्हल.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम: ओली पोप (कर्णधार), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, जॉर्डन कॉक्स, हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मार्क वुड, शोएब बशीर, ओली स्टोन आणि मॅट पॉट्स.
टेस्ट सीरिजसाठी श्रीलंका क्रिकेट टीम : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पाथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चांदिमल, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो, कसुन रजिथा, लाहिरू कुमारा, निसाला थारका, प्रभात जयसूर्या, रमेश मेंडिस, जेफ्री वेंडरसे आणि मिलन रथनायके.