ENG vs SL : दुसऱ्या डावात इंग्लंडचा खेळ 251 धावांवर आटोपला, श्रीलंकेसमोर 482 धावांचं आव्हान

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. तीन सामन्यातील पहिला सामना जिंकून इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यावरही इंग्लंडची पकड दिसत आहे. पण अडीच दिवसांचा खेळ शिल्लक असून श्रीलंका हे आव्हान पेलणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ENG vs SL : दुसऱ्या डावात इंग्लंडचा खेळ 251 धावांवर आटोपला, श्रीलंकेसमोर 482 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 8:20 PM

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु असून तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने सर्व गडीबाद 251 धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी 482 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान श्रीलंकेसाठी खूपच मोठं आहे. पण अडीच दिवसांचा खेळ शिल्लक असल्याने काहीही होऊ शकतं. इंग्लंडकडून जो रुटने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी कामगीरी करू शकला नाही. बेन डकेटने 24, डॅन लॉरेन्स 7, ओली पोप 17, जो रूट 103, हॅरी ब्रूक 37, जेमी स्मिथ 26, ख्रिस वोक्स 5, गस एटकिंसन 14, मॅथ्यू पोट्स 2 आणि ओली स्टोनने 7 धावा केल्या. श्रीलंकेकडून असिथान फर्नांडोने 3, लहिरू कुमाराने 3, मिलन रथनायकेने 2 आणि प्रभाथ जयसूर्याने 2 गडी बाद केले.

दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला. श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात इंग्लंडने 427 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव अडखळला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 196 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात 231 धावांची मजबूत आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात इंग्लंडने 251 धावा केल्या आणि विजयासाठी 482 धावा विजयासाठी दिल्या आहेत. खरं तर हे आव्हान श्रीलंकेसाठी कठीण आहे. हा सामना इंग्लंडने जिंकला तर मालिका 2-0 ने खिशात घालेल. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठी उलथापालथ होईल. इंग्लंडचं तसं पाहिलं तर अंतिम फेरीचं गणित चुकलं आहे.  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत स्लो ओव्हर रेटचा फटका बसला. त्यामुळे विजयी टक्केवारीतील गुण कापण्यात आले. पण एखादा चमत्कार घडला तर अंतिम फेरीत स्थान मिळू शकतं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, निशान मदुष्का (विकेटकीपर), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल, धनंजया डी सिल्वा (कर्णधार), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन प्रियनाथ रथनायके.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, डॅनियल लॉरेन्स, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, ऑली स्टोन, शोएब बशीर.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.