ENG vs SL: दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन जाहीर, कुणाला संधी?

England vs Sri Lanka 2nd Test: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे.

ENG vs SL: दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन जाहीर, कुणाला संधी?
england test cricket team joe rootImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 6:51 PM

श्रीलंका क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यजमान इंग्लंडने पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर 5 विकेट्सने विजय मिळवला. श्रीलंकेने पहिल्या सामन्यात जोरदार प्रतिकार केला, मात्र जो रुट याच्या अर्धशतकी खेळीमुळे इंग्लंडचा विजय झाला. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.त्यानंतर आता उभयसंघात 29 सप्टेंबरपासून लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड या ऐतिहासिक स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

इंग्लंडने दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. मार्क वूड याच्या जागी ओली स्टोन याचा समावेश करण्यात आला आहे. मार्क वूड याला सलामीच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे मार्क वूडला उर्वरित मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. आता त्याच्या जागी ओली स्टोन खेळताना दिसणार आहे.

श्रीलंकेची ‘कसोटी’

दरम्यान श्रीलंका या 3 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे श्रीलंकेला मालिकेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर दुसरा सामना जिंकावा लागेल, किंवा सामना बरोबरीत सोडवावा लागेल. त्यामुळे श्रीलंकेची कसोटी असणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

दुसरा सामना, 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर, लॉर्ड्स, लंडन

तिसरा सामना, 6 ते 10 सप्टेंब, केनिंग्टन ओव्हल, लंडन

इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन जाहीर

दुसर्‍या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर

इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम : धनंजया डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्व फर्नांडो, मिलन रथनायके, लहिरु कुमारा, राजेराह कुमारा, सदीरा समरविक्रमा, कसून रजिथा, पथुम निसांका, निसाला थाराका, जेफ्री वेंडरसे आणि रमेश मेंडिस.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.