ENG vs SL: जो रुट इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, पहिल्या कसोटीत महारेकॉर्ड करण्यासाठी सज्ज
England vs Sri Lanka 1st Test : इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट श्रीलंके विरूद्धच्या कसोटी मालिकेत महारेकॉर्ड करण्यासाठी सज्ज झाला आहे.
श्रीलंका क्रिकेट टीम धनंजया डी सिल्वा याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज पहिल्या सामन्यात महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. जो रुटला इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम करण्याची संधी आहे. रुटच्या निशाण्यावर माजी कर्णधार आणि सलामीवीर एलिस्टर कूक याचा सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. रुटने पहिल्या सामन्यात अपेक्षित कामगिरी केल्यास, तो इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.
अॅलिस्टर कुक याने इंग्लंडसाठी 161 कसोटी सामन्यांमधील 291 डावांमध्ये 12 हजार 472 धावा केल्या आहेत. यामध्ये 33 शतकं आणि 57 अर्धशतकांचा समावेश आहे. तर इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत जो रुट हा दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. जो रुटने आतापर्यंत 12 हजार 27 धावा केल्या आहेत. रुटने या 2 सामन्यांच्या मालिकेत 446 धावा केल्यास, तो इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. तसेच अॅलिस्टर कूक याचा रेकॉर्ड ब्रेकही होईल.
श्रीलंकेविरुद्धची कामगिरी
दरम्यान जो रुट याने श्रीलंके विरुद्ध 10 कसोटी सामने खेळले आहेत. रुटने या 10 सामन्यांमध्ये 58.88 च्या सर्वोत्तम सरासरीने 1 हजार 1 धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंडसाठी श्रीलंके विरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रमही अॅलिस्टर कूक याच्याच नावे आहे. कूकने श्रीलंके विरुद्ध 1 हजार 290 धावा केल्या आहेत.
रुटच्या निशाण्यावर कूकचा रेकॉर्ड
Joe Root will be in action tomorrow onwards. Will he able to surpass Kumar Sangakkara atleast in this 3 match test series. He needs only 373 more runs to achieve this feat pic.twitter.com/THnzBVy5ZF
— Politics N Cricket 🏏 🇮🇳🏴🎵 🎥🎤 (@rs_3702) August 20, 2024
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, कामिंदू मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, विश्वा फर्नांडो आणि मिलन रथनायके,
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), डॅन लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मॅथ्यू पॉट्स, मार्क वुड आणि शोएब बशीर.