ENG Vs WI 2nd Test: इंग्लंडचा झंझावात, विंडिज विरुद्ध वेगवान अर्धशतकासह वर्ल्ड रेकॉर्ड
England vs West Indies 2nd Test: इंग्लंडने विंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. इंग्लंडने नक्की काय केलंय? जाणून घ्या.
इंग्लंड क्रिकेट टीम त्यांच्या बेझबॉल स्टाईल क्रिकेटसाठी परिचित आहे. साधारणपणे कसोटी क्रिकेटमध्ये संथ गतीने धावा होताना दिसतं. मात्र इंग्लंडने कसोटीतही टी20 प्रमाणे खेळण्याचा पायंडा पाडला आहे. इंग्लंडने बेझबॉल पद्धतीने खेळ करत धमाका केलाय. इंग्लंडने वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. इंग्लंडने विंडिज विरुद्ध स्फोटक बॅटिंग करत विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. इंग्लंडने कसोटीमध्ये वेगवान अर्धशतक ठोकलं आहे.
विंडिजने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विंडिजने पहिल्याच ओव्हरमध्ये झॅक क्रॉली याला झिरोवर आऊट केलं. इंग्लंडला धावांचं खातं उघडण्याआधी पहिला धक्का लागला. त्यामुळे इंग्लंड सावधपणे खेळेल असं वाटत होतं, मात्र झालं उलटंच. इंग्लंडच्या फलंदाजांनी तोडफोड बॅटिंग करत इतिहास रचला. बेन डकेट आणि ओली पोप या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी विस्फोटक आणि वादळी अर्धशतकी भागीदारी केली.
इंग्लंडने पहिली विकेट ही पहिल्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर गमावली. झॅक क्रॉली 3 बॉल खेळून झिरोवर परतला. त्यानंतर डकेट आणि ओली पोप या जोडीने अवघ्या 4.2 ओव्हरमध्ये नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी फक्त 23 बॉलमध्ये अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. इंग्लंडने यासह कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा स्वत:चाच वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. इंग्लंडने याआधी 1994 साली दक्षिण आफ्रिके विरुद्ध 27 बॉलमध्ये अर्धशतक अर्थात 50 धावा पूर्ण केल्या होत्या. तसेच 2002 साली इंग्लंडने 5 ओव्हरमध्ये 50 धावा केल्या होत्या.
इंग्लंडकडून स्वत:चाच वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
𝑩𝒂𝒛𝒃𝒂𝒍𝒍 𝒋𝒖𝒔𝒕 𝒈𝒐𝒕 𝒓𝒆𝒂𝒍 😮💨
Fastest-ever team fifty in the history of Test cricket 💥#ENGvWI #BenDuckett pic.twitter.com/PMM1naI7SE
— OneCricket (@OneCricketApp) July 18, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.