ENG vs WI 2nd Test 1st Day Stumps : इंग्लंड 416 धावांवर ऑलआऊट, ओली पोपची शतकी खेळी
England vs West Indies 2nd Test Day 1 Stumps: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी साम्यातील पहिल्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. इंग्लंडने ऑलआऊट 416 धावा केल्या आहेत.
इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात नॉटिंघम ट्रेन्टब्रिज येथे दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसर्या मॅचमध्ये पहिल्या डावात ऑलआऊट 400 पार मजल मारली आहे. इंग्लंडने 88.3 ओव्हरमध्ये 416 धावा केल्या. इंग्लंडसाठी ओली पोप याने सर्वाधिक धावा केल्या. ओली पोप याने 121 धावा केल्या. तर दोघांनी अर्धशतक ठोकली. तसेच विंडिजकडून अल्झारी जोसेफ याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा डाव आटोपताच पहिल्या दिवसाचा खेळही संपला आहे.
विंडिजने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विंडिजने इंग्लंडला धावांचं खातं उघडण्याआधीच पहिला झटका दिला. झॅक क्रॉली 3 बॉल खेळून आला तसाच झिरोवर आऊट होऊन गेला. तर गस एटीक्सन आणि शोएब बशीर या दोघांनी अनुक्रमे 2 आणि 5 धावा केल्या. दोघांचा अपवाद वगळता इतरांनी चांगली बॅटिंग केली. मात्र ओली पोप व्यतिरिक्त एकालाही मोठी खेळी करता आली नाही. पोपने 167 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 15 चौकारांच्या मदतीने 121 धावा केल्या.
तर बेन डकेट याने 59 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन बेन स्टोक्स याने 104 बॉलमध्ये 8 फोरसह 68 रन्स केल्या. तर ख्रिस वोक्स 37, विकेटकीपर जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक या दोघांनी प्रत्येकी 36 धावा केल्या. जो रुट 14 आणि मार्क वूडने 13 धावा जोडल्या. अल्झारीने विंडिजसाठी 98 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. कावेम हॉज, जेडेन सील्स आणि केविन सिंक्लेअर या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर शामर जोसेफ याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी विंडिज या 416 डोंगराएवढ्या धावांचा पाठलाग कशाप्रकारे करते, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
इंग्लंड ऑलआऊट, पहिल्या दिवसाचा खेळ संपला
All out at the end of Day 1 ✅ pic.twitter.com/JPYY4X5JVa
— England Cricket (@englandcricket) July 18, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.