ENG vs WI 2nd Test: कावेम हॉजची शतकी खेळी, दुसऱ्या दिवशी 351 धावा, विंडिजचा चिवट प्रतिकार
England vs West Indies, 2nd Test Stumps: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसर्या कसोटी सामन्यातील दुसर्या दिवसाचा खेळ संपला आहे. विंडिजने 416 धावांच्या प्रत्युत्तरात 351 पर्यंत मजल मारली.
वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने दुसर्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. वेस्ट इंडिजने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 84 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 351 धावा केल्या आहेत. विंडिजकडून कावेम हॉज याने शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे विंडिजला 350 पार मजल मारण्यात यश आलं. मात्र त्यानंतरही इंग्लंडकडे 65 धावांची आघाडी आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ऑलआऊट 416 धावा केल्या होत्या. आता तिसऱ्या दिवशी विंडिज अशीच बॅटिंग करत इंग्लंडवर आघाडी मिळवणार की यजमान संघ पाहुण्यांना रोखणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
विंडिजचं जोरदार कमबॅक
क्रेग ब्रॅथवेट आणि मिकील लुईस या सलामी जोडीने 53 धावांची भागीदारी केली. लुईसने 41 बॉलमध्ये 21 धावा केल्या. क्रेग ब्रॅथवेट 48 आणि कर्क मॅकेन्झी 11 धावा करुन आऊट झाले. त्यामुळे विंडिजची स्थिती 3 बाद 84 अशी झाली. त्यामुळे विंडिज अडचणीत सापडली. त्यानंतर अलिक अथनाझे आणि कावेम हॉज या दोघांनी विंडिजचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 175 धावांनी निर्णायक भागीदारी केली. अथनाझे 99 बॉलमध्ये 10 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने 82 धावा करुन आऊट झाला. तर दुसऱ्या बाजूला कावेमने आपल्याच चौथ्याच सामन्यात पहिलंवहिलं कसोटी शतक झळकावलं.कावेमने 171 बॉलमध्ये 19 चौकारांसह 120 धावांची खेळी केली. हॉजच्या या खेळीमुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपपर्यंत विंडिजला 84 ओव्हरमध्ये 351 धावांपर्यंत पोहचता आलं. विंडिज आता इंग्लंडच्या पहिल्या डावातील 416 धावांपासून फक्त 65 धावांनी मागे आहे. इंग्लंडकडून सर्वाधिक 2 विकेट्स या शोएब बशीर याने घेतल्या. तर जेसन होल्डर 23 आणि जोशुआ डा सिल्वा 32 धावा करुन नाबाद परतले.
दुसऱ्याच दिवसाचा खेळ आटोपला
STUMPS: What a day of Test cricket!🏏
🔹️A massive 1️⃣7️⃣5️⃣ run partnership✅️ 🔹️Maiden Test Century ✅️#ENGvWI | #MenInMaroon | #Apex pic.twitter.com/j1GGPSg4zD
— Windies Cricket (@windiescricket) July 19, 2024
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.