ENG vs WI: इंग्लंडचा तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी विजय, विंडिजचा 10 विकेट्सने धुव्वा

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत तीन पैकी तीन सामने जिंकत वेस्ट इंडिजला इंग्लंडने व्हाईट वॉश दिला. इंग्लंडने तिसरा कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच खिशात घातला.

ENG vs WI: इंग्लंडचा तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी विजय, विंडिजचा 10 विकेट्सने धुव्वा
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 8:46 PM

इंग्लंडने तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला 10 गडी राखून पराभूत केलं. तीन सामन्यांच्या मालिकेत सुरुवातीचे दोन सामने गमवल्याने वेस्ट इंडिज संघावर दडपण होतं. तिसऱ्या सामन्यातही वेस्ट इंडिज संघावरील दडपण कायम राहिलं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच पहिल्या डावात 282 धावा केल्या. त्यामुळे हा सामना रंगतदार होणार असंच वाटत होतं. पण इंग्लंडने पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली. तसेच 376 धावा करत 94 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात मात्र वेस्ट इंडिजला लय काय सापडली नाही. संपूर्ण संघ 175 धावा करू शकला. त्यामुळे आधीच 94 धावांची आघाडी वजा करता 81 धावांचं आव्हान समोर ठेवलं. खरं तर हे इंग्लंडसाठी सोपं आव्हान होतं. इंग्लंडने बेझबॉल निती वापरत गोलंदाजांवर प्रहार केला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.  इंग्लंडने हे आव्हान एकही गडी न गमवता पूर्ण केलं. इंग्लंडने हा सामना तिसऱ्या दिवशीच जिंकला. तसेच वेस्ट इंडिजला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईट वॉश दिला.

या मालिकेत अनेक विक्रमांची नोंदी झाल्या. बेस्ट स्टोक्सने 24 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तसेच 4.2 षटकातच संघाच्या धावा 50 झाल्या होत्या. हा देखील एक विक्रम झाला आहे. बेन स्टोक्स आणि बेन डकेट्सने 44 चेंडूत नाबाद 87 धावांची भागीदारी केली. टेस्ट क्रिकेटमधील सर्वात वेगाने केलेली भागीदारी ठरली आहे. इंग्लंडने वेस्ट इंडिजला चौथ्यांदा घरच्या मैदानावर क्लिन स्वीप दिला आहे. यापूर्वी 1928, 2004, 2009 आणि आता 2024 साली व्हाईट वॉश दिला आहे. या विजयानंतर इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत फायदा झाला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.

वेस्ट इंडीज प्लेइंग इलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकाईल लुईस, किर्क मॅकेन्झी, ॲलिक अथनाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटीये, शामर जोसेफ आणि जयडेन सील्स.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.