ENG vs WI : शेवटच्या कसोटीसाठी जेम्स अँडरसनने घातले स्पेशल बूट, लिहिलंय असं काही
इंग्लंड विरुद्ध वेस्ट कसोटी सामना सुरु आहे. हा सामना जेम्स अँडरसनच्या क्रिकेट कारकिर्दितील शेवटचा सामना आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. जेम्स अँडरसनने आपल्या भेदक गोलंदाजीने क्रीडारसिकांची मनं यापूर्वीच जिंकली आहेत. असं असताना शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने घातलेले बूट विशेष ठरले आहेत.
इंग्लंडच्या ताफ्यातील प्रमुख अस्त्र म्हणजे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन..गेली अनेक वर्षे त्याने इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. हातातून गेलेल्या सामन्यातही पुनरागमन करून दिल्याची अनेक उदाहरणं आहे. अँडरसन हा कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे त्यामुळे आपल्या लाडक्या गोलंदाजाची शेवटचा सामना पाहण्यासाठी लॉर्ड्स मैदान गच्च भरलं आहे. शेवटच्या सामन्यात त्याच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक केलं जात आहे. फलंदाजीला आला तेव्हा चाहत्यांनी उभं राहून त्याचं स्वागत केलं. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व जेम्स अँडरसनमुळे वाढलं आहे हे मात्र नक्की..असं असताना जेम्स अँडरसनने घातलेल्या बूटांनी लक्ष वेधून घेतल आहे. एडीडासने जेम्स अँडरसनसाठी खास बूट डिझाईन केले आहेत. त्याच्या डाव्या बुटावर 22.05.2003 तर उजव्या बुटावर 10.07.2024 असं लिहिलं आहे. या दोन तारखांमध्ये जेम्स अँडरसनची संपूर्ण क्रिकेट कारकिर्द आहे. 22 मे 2003 रोजी जेम्स अँडरसनने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर 10 जुलै 2024 हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दिचा शेवटचा दिवस आहे.
दुसरीकडे, जेम्स अँडरसनच्या बुटावर 188 हा शिक्का देखील मारण्यात आला आहे. ही त्याने खेळलेल्या विक्रमी कसोटी सामन्यांची संख्या आहे. वेस्ट इंडिज विरुद्धचा हा त्याच्या कसोटी कारकिर्दितील 188 वा कसोटी सामना आहे. दरम्यान पहिल्या डावात जेम्स अँडरसनने 10.4 षटकं टाकली. यात तीन षटकं निर्धाव टाकली तसेच 1 गडी बाद केला. तसेच जेम्स अँडरसन फलंदाजीसाठीही उतरला होता. मात्र त्याच्या वाटेला एकही चेंडू आला नाही. जेमी स्मिथ बाद झाला आणि त्याला फलंदाजी करताना पाहण्याचं स्वप्न भंगलं. इंग्लंडने दुसऱ्या डावात 371 धावा केल्या आणि 250 धावांची आघाडी घेतली. आता वेस्ट इंडिज संघ फलंदाजीसाठी उतरला असून जेम्स अँडरसनकडून अपेक्षा आहेत.
Jimmy Anderson wearing special shoes. ❤️ pic.twitter.com/o8cGgPpb6T
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 11, 2024
दोन्ही संघांची प्लेइंग 11
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकाइल लुईस, किर्क मॅकेन्झी, ॲलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ, जयडेन सील्स.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन.