ENG vs WI 3rd Test: इंग्लंडची तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग 11 जाहीर, कुणाला संधी?
England vs West Indies 3rd Test: विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. पाहा प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला मिळाली संधी?

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम क्रेग ब्रेथवेट याच्या नेतृत्वात सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. इंग्लंडने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने एकतर्फी अंतराने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता इंग्लंडने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने क्रिकेटने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.
बेन स्टोक्स तिसऱ्या सामन्यातही इंग्लंडचं प्रतिनिधित्व करणार आहे. तर क्रेग ब्रेथवेट वेस्ट इंडिजचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन बेन स्टोक्स याने आपल्या त्याच प्लेइंग ईलेव्हनवर विश्वास दाखवला आहे. सीरिजमधील तिसरा आणि अंतिम सामना हा एजबेस्टन येथे शुक्रवार 26 जुलैपासून सुरु होणार आहे. इंग्लंडने याआधी विंडिजवर लॉर्ड्स आणि ट्रेंट ब्रिजमधील सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.
मालिकेत आतापर्यंत काय झालं?
इंग्लंडने पहिल्या कसोटीत विंडिजवर डाव आणि 114 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने हा सामना हा तिसऱ्याच दिवशी जिंकला. तर इंग्लंडने दुसरा सामना हा चौथ्या दिवशी जिंकला. इंग्लंडने या सामन्यात 241 धावांनी जिंकला. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. मालिकेतील पहिला सामना 10 आणि दुसरा सामना हा 18 जुलैला खेळवण्यात आला.
इंग्लंडची तिसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा
📋 We’ve announced our squad for the third Test against the West Indies at Edgbaston 👇
— England Cricket (@englandcricket) July 21, 2024
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज क्रिकेट टीम: क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, जेडेन सील्स, केविन सिंक्लेअर, टेविन इम्लाच,जेरेमिया लुईस आणि झॅकरी मॅककास्की.