ENG vs WI 2nd Test: विंडिजची इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा
West Indies vs England 2nd Test: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा 18 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड विरुद्ध विंडिज यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या कसोटी सामन्याला 18 जुलैपासून सुरुवात होणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला पाहुण्या वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने इंग्लंडच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. इंग्लंड पाठोपाठ विंडिजने दुसऱ्या सामन्यासाठी आपल्या अंतिम 11 खेळाडूंची घोषणा केली आहे. विंडिज क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.
विंडिजकडून इंग्लंडची कृती कॉपी पेस्ट
विंडिजने इंग्लंडप्रमाणे सामन्याआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंडने मंगळवारी 16 जुलै रोजी अंतिम 11 खेळांडूंची नावं जाहीर केली. त्यानंतर आता विंडिजने आपल्या 11 खेळाडूंची नावं उघड केली आहेत. विंडिजला पहिल्या सामन्यात तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र त्यानंतरही टीम मॅनेजमेंटने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेले नाही. तर दुसर्या बाजूला पहिल्या सामन्यानंतर जेम्स अँडरसन निवृत्त झाल्याने त्याच्या जागी मार्क वूडच्या रुपात एकमेव बदल केला आहे.
सामन्याबाबत थोडक्यात
दरम्यान इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा ट्रेन्ट ब्रिज, नॉटिंघम येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 3 वाजता टॉस होईल. सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
विंडिजची दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर
🚨BREAKING NEWS🚨 An unchanged playing XI will face England in the 2nd Test at Trent Bridge.#ENGvWI | #MenInMaroon | #Apex pic.twitter.com/cQK8tDVgK0
— Windies Cricket (@windiescricket) July 17, 2024
दुसर्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि शोएब बशीर.
वेस्ट इंडिज प्लेइंग ईलेव्हन: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकील लुईस, कर्क मॅकेन्झी, अलिक अथनाझे, कावेम हॉज, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.