IND W vs ENG W | इंग्लडंचा भारतीय महिला संघावर 38 धावांनी विजय, मालिकेत आघाडी

ind W VS eng W : भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये इंग्लंड संघाने 38 धावांनी विजय मिळवत आहे. या विजयासह इंग्लंड संघाने मालिकेत आघाडी घेतली आहे. सलामीवीर शेफामी वर्माची अर्धशतकी खेळी वाया केली.

IND W vs ENG W | इंग्लडंचा भारतीय महिला संघावर 38 धावांनी विजय, मालिकेत आघाडी
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 1:10 AM

मुंबई : भारत आणि  इंग्लंड महिला संघामधील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा 38 धावांनी पराभव झाला आहे. वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने 20 ओव्हरमध्ये 197-6 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाचा डाव 20 ओव्हरमध्ये 159-6 धावांवर आटोपला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत इग्लंड संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताकडून शेफाली वर्माने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली.

इंग्लंड संघ प्रथम बॅटींगला उतरला होता, मात्र एकदम खराब सुरूवात झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये सोफिया डंकले 1 धाव  आणि अॅलिस कॅप्सी यांनी रेणूका ठाकूर सिंग हिने माघारी पाठवलं. दोघी आऊट झाल्यानंतर डॅनियल व्याट आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांनी भागादारी केली. दोघी आऊट झाल्यानंतर डॅनियल व्याट आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांनी मजबूत भागादारी केली. दोन धावांवर दोन विकेट अशी इंग्लंड संघाची अवस्था होती मात्र दोघींनीही डावाची सूत्र आपल्या हातात घेतली. भारतीय गोलदाजांची परीक्षा घेतली. कारण पहिल्या ओव्हरमध्ये मिळालेल्या दोन विकेटनंतर भारतीय महिला गोलंदाजांना तिसऱ्या विकेटसाठी तब्बल 16 ओव्हरची वाट पाहावी लागली.

डॅनियल व्याटला पदार्पण करणाऱ्या सायका इशाकने 75 धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर आलेल्या हेदर नाइटला 6 धावांवर श्रेयांका पाटीलने बोल्ड केलं. शेवटला आलेल्या एमी जोन्स हिने अवघ्या 9 बॉलमध्ये 23 धावा केल्या. यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार मारला.  नॅट सायव्हर-ब्रंटला 77 धावांवर रेणूक सिंह ठाकूर हिने आऊट केलं. रेणूकाने भारताकडून सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

भारताचा डाव

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. स्टार खेळाडू स्मृती मंधाना अवघ्या 6 धावांवर आऊट झाली. सहाव्या ओव्हरमध्ये जेमिमाह रॉड्रिग्स 4 धावा करून परतली. एकीकडे विकेट पडत असताना शेफाली वर्माने आपला दांडपट्टा सुरू ठेवला होता.

हरमनप्रीत कौरनेही मोठे फटके मारले, तीन चौकार आणि 1 षटकार मारत इंग्लंडवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र 11 व्या ओव्हरमध्ये तिला 26 धावांवर सारा ग्लेनने बोल्ड केलं.  रिचा घोषलाही फार काही चमक दाखवता आली नाही. 21 धावांवर आईट झाली. विकेट पडत असल्याने दवाब वाढत गेला आणि अर्धशतक केलेली शेफालीसुद्धा 52 धावांवर आऊट झाली. विकेट गेल्याने चेंडू कमी राहिले आणि धावा जास्त अखेर भारताचा 38 धावांनी पराभव झाला.

भारतीय महिला संघ प्लेईंग ईलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), श्रेयांका पाटील, कनिका आहुजा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग आणि सायका इशाक

इंग्लंड महिला संघ प्लेईंग ईलेव्हन | हेदर नाइट (कर्णधार), डॅनियल व्याट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल आणि माहिका गौर.

पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.