WTC 2025 : मालिका ड्रॉ झाल्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला जबर फटका, भारत-पाकिस्तानला अंतिम फेरी गाठणार?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची दोन पर्व पार पडली असून आता तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका मालिका पार पडली. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित बदललं आहे.

WTC 2025 : मालिका ड्रॉ झाल्याने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला जबर फटका, भारत-पाकिस्तानला अंतिम फेरी गाठणार?
WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान? कसं असेल गणित ते वाचा
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 4:34 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या साखळी फेरीला सुरुवात झाली आहे. दोन वर्षानंतर आयसीसी गुणतालिकेत टॉपला असलेले दोन संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला प्रत्येक कसोटी मालिका ही महत्त्वाची ठरणार आहे. एक मालिका ड्रॉ होणं किंवा पराभूत होणं विजयी टक्केवारीवर परिणाम करून जातं. आतापर्यंत सहा देशांमध्ये तीन कसोटी मालिका पार पडल्या आहेत. त्यात भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी मालिका जिंकल्या आहेत. तर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका ड्रॉ झाली आहे. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचं नुकसान झालं आहे. पदरात जास्त गुण पडले असले तरी विजयी टक्केवारी मोठा फरक दिसून आला आहे.

कसं आहे आयसीसी कसोटी गुणतालिकेचं गणित?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत नऊ संघ आहेत. यात टॉपला असलेल्या दोन सघांची वर्णी अंतिम फेरीत लागणार आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिक 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पदरात दोन विजयांसह 24 गुण पडले आहेत. पाकिस्तानची विजयी टक्केवारी 100 टक्के असल्याने अव्वल स्थानी आहे. तर श्रीलंकेचं खात्यात काहीच नाही.

दुसरीकडे, वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला. एका विजयासह पदरात 12 गुणांची कमाई झाली. पण दुसरा सामना ड्रॉ झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येक 4 गुण देण्यात आले. त्यामुळे भारताच्या विजयी टक्केवारीत घसरण झाली. 66.67 विजयी टक्केवारीसह टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ 4 गुण आणि 16.67 विजयी टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड पाच सामन्याची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सुटल्याने दोन्ही संघांना फटका बसला आहे. दोन्ही संघांचे गुण अव्वल संघांच्या तुलनेत जास्त आहेत. म्हणजेच दोन्ही संघांना प्रत्येकी 26 गुण मिळाले आहेत. पण विजयी टक्केवारी घसरण दिसून आली आहे. दोन्ही संघांची विजयी टक्केवारी 43.33 इतकी आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आगामी मालिकेत विजयी घोडदौड कायम ठेवली तर अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना क्रीडाप्रेमींना पाहता येणार आहे.

भारताच्या आगामी कसोटी मालिका

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (दोन सामने) डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024
  • भारत विरुद्ध इंग्लंड (पाच सामने) जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2024
  • भारत विरुद्ध बांगलादेश (दोन सामने) सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (तीन सामने) ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पाच सामने) नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025

पाकिस्तानच्या आगामी कसोटी मालिका

  • पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया(तीन सामने) डिसेंबर 2023-जानेवारी 2024
  • पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज (दोन सामने) फेब्रुवारी 2024- मार्च 2024
  • पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (दोन सामने) ऑगस्ट 2024-सप्टेंबर 2024
  • पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (तीन सामने) ऑक्टोबर 2024
  • पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (दोन सामने) जानेवारी 2025
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.