India vs England Odi Series 2021 | टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडची घोषणा
टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी (for their odi series) इंग्लंड संघाची (England announced 14 member squad) घोषणा करण्यात आली आहे.
पुणे : टीम इंडियाने इंग्लंडला टी 20 मालिकेत 3-2 ने पराभूत केलं. यासह भारताने टी 20 सीरिज जिंकली. या मालिकेनंतर उभय संघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात (India vs England Odi Series 2021) येणार आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 14 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इयोन मॉर्गन (Eoin Morgan) इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. आयसीसीने (ICC) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (England announced 14 member squad for their odi series against India)
??????? England have named a 14-member squad for their ODI series against India, starting 23 March.
Jofra Archer misses out because of an elbow injury.#INDvENG pic.twitter.com/CXNaWHBHI3
— ICC (@ICC) March 21, 2021
जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे संघाबाहेर
इंग्लंडचा वेगवान आणि मुख्य गोलंदाज जोफ्रा आर्चरला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावे लागले आहे. जोफ्राच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे. यामुळे त्याला या एकदिवसीय मालिकेत स्थान देण्यात आलेले नाही. तसेच तो आयपीएलच्या 14 व्या मोसमात खेळणार नसल्याचंही समजत आहे.
जो रूटला संधी नाही
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी आणि टी 20 मालिकेतील खेळाडूंचीच या एकदिवसीय मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. पण यामध्ये कसोटी कर्णधार जो रुटला संधी मिळाली नाही. यामागे रोटेशन पॉलिसीचं कारण सांगण्यात येत आहे. यानुसार तिनही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात येते. जो रुट कसोटी मालिकेनंतर मायदेशी रवाना झाला होता.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
23 मार्च | पहिली मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं
26 मार्च | दूसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं
28 मार्च | तिसरी मॅच, गहुंजे स्टेडियम, पुणे | दुपारी 1 वाजून 30 मिनिटं
इंग्लंडची 14 सदस्यीय टीम
इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले आणि मार्क वुड
राखीव खेळाडू
ख्रिस जॉर्डन, जॅक बॉल आणि डेव्हिड मलान
एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.
संबंधित बातम्या :
(England announced 14 member squad for their odi series against India)