Cricket : 2 मालिका 8 सामने आणि 14 खेळाडू, वनडे आणि टी 20I सीरिजसाठी संघ जाहीर
Cricket: एकदिवसीय आणि टी 20i मालिकेसाठी क्रिकेट बोर्डाने 14 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. दुखापतीनंतर नियमित कर्णधाराचं संघात पुनरागमन झालं आहे. पाहा आणखी कुणाला मिळाली संधी.
इंग्लंडला मायदेशात ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 3-2 ने मात करत वनडे सीरिज जिंकली. इंग्लंड टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. इंग्लंड पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड वेस्ट इंडिज दौरा करणार आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका होणार आहे. उभयसंघात दोन्ही मालिकेत एकूण 8 सामने होणार आहेत. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंडचा नियमित कर्णधार जॉस बटलर याचं कमबॅक झालं आहे. बटलरला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजला मुकावं लागलं होतं. आता मात्र बटलर सज्ज आहे. तसेच जाफर चौहान याला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तसेच हॅरी ब्रूक याला विश्रांती देण्यात आली आहे. तर जॉन टर्नर आणि डॅन मूसली या दोघांना कायम ठेवण्यात आलं आहे. हे दोघे ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेचा भाग होते. तर टर्नर गेल्या डिसेंबर महिन्यात विंडिज दौऱ्यात सहभागी होता.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, गुरुवार 31 ऑक्टोबर
दुसरा सामना, शनिवारी 2 नोव्हेंबर
तिसरा सामना, बुधवार 6 नोव्हेंबर
विंडिज दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, जॉस बटलरचं कमबॅक
Jos Buttler is back fit ✅ Jafer Chohan’s gets first call-up ✅
Read more about our upcoming trip to the Carribean 👇
— England Cricket (@englandcricket) October 2, 2024
टी 20I मालिका
पहिला सामना, शनिवार 9 नोव्हेंबर
दुसरा सामना, रविवार 10 नोव्हेंबर
तिसरा सामना, गुरुवार 14 नोव्हेंबर
चौथा सामना, शनिवार 16 नोव्हेंबर
पाचवा सामना, रविवार 17 नोव्हेंबर
विंडिज विरूद्धच्या वनडे आणि टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम: जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, जॅकब बेथेल, जाफर चौहान, सॅम करन, विल जॅक्स, लियाम लिविंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मूसली, जेमी ओवरटन, आदिल राशिद, फिल साल्ट, रीस टॉप्ले आणि जॉन टर्नर.