IND vs ENG | पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी प्लेईंग ईलेव्हन जाहीर, टीममध्ये 1 बदल
India vs England 5th Test | टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. तर पाचवा आणि अखेरचा सामना हा 7 मार्चपासून धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे.
धर्मशाला | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम सामना हा हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे. हा पाचवा सामना 7 मार्चपासून सुरु होणार आहे. सामन्याच्या एक दिवसआधी इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंड क्रिकेटने एक्स अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये फक्त 1 बदल केला आहे. इंग्लंडने कुणाला संधी दिली आणि कुणाला बाहेरचा रस्ता दाखवला हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. पहिला सामना इंग्लंडने जिंकल्यानंतर टीम इंडियाने त्यानंतर जोरदार कमबॅक केलं. टीम इंडियाने सलग 3 सामने जिंकत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. इतकंच नाही, तर मालिकाही जिंकली. त्यामुळे आता इंगलंडचा टीम इंडियाला विजयी चौकार मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी इंग्लंडने 1 बदल केलाय. इंग्लंडने ऑली रॉबिन्सन याच्या जागी मार्क वूड याचा समावेश केला आहे.
जॉनी बेयरस्टो याला प्लेईंग ईलेव्हनमध्ये कायम ठेवलं आहे. त्यामुळे जॉनी बेयरस्टो टीम इंडिया विरुद्ध धर्मशालेत आपल्या कसोटी कारकीर्दीतील 100 वा सामना खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे. बेयरस्टोने 2012 साली कसोटी पदार्पण केलं होतं. बेयरस्टोने तेव्हापासून ते आतापर्यंत इंग्लंडसाठी 99 कसोटी सामने खेळले आहेत. बेयरस्टोने 36.4 च्या सरासरीने या 99 सामन्यांमध्ये 12 शतकं आणि 26 अर्धशतकांसह 5 हजार 974 धावा केल्या आहेत. आता बेयरस्टो 100 व्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहेत.
इंग्लंडच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल
We make one change for the final match of the series 🔁
🇮🇳 #INDvENG 🏴 | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) March 6, 2024
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.