हैदराबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 25 जानेवारीपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर बेन स्टोक्स इंग्लंडचा कॅप्टन असणार आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हन जाहीर करण्यात आली आहे. टीमच्या सोशल मीडियावर हँडलवरुन प्लेईंग ईलेव्हन जाहीर करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातून युवा खेळाडू पदार्पण करणार आहे. तर अनुभवी गोलंदाजाला प्लेईंग ईलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.
इंग्लंडने सामन्याच्या 24 तासांआधीच प्लेईंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. या प्लेईंग ईलेव्हनमध्ये अुनभवी वेगवान गोलंदाज जेम्स एंडरसन याचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच इंग्लंड या सामन्यात 3 स्पिनरसह मैदानात उतरणार आहे. इंग्लंड टीममध्ये एका वेगवान गोलंदाजाचा समावेश करम्यात आला आहे. तर लंकाशायरसाठी खेळणारा टॉम हार्टले याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. टॉम हार्टले याने 20 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 40 विकेट्स घेतल्या आहेत. तर ओली पोप, रेहान अहमद, जॅक लीच आणि बेन फोक्स या चौघांची एन्ट्री झाली आहे.
दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जेम्स एंडरसन याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना झटका लागला आहे. एंडरसनने टीम इंडिया विरुद्धच्या 35 कसोटी सामन्यांमध्ये 139 विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन जाहीर
We’ve named our XI for the first Test in Hyderabad! 🏏
🇮🇳 #INDvENG 🏴 | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) January 24, 2024
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.