इंग्लंडच्या टी ट्वे्न्टी स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजाचा क्रिकेटला ‘गुडबाय’, सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी (Harry Gurney) याने क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. (England Bowler Harry Gurney Retires All format Of Cricket)

इंग्लंडच्या टी ट्वे्न्टी स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजाचा क्रिकेटला 'गुडबाय', सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 8:03 AM

मुंबई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी (Harry Gurney) याने क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मागील काही काळापासून खांद्याच्या दुखापतीने तो त्रस्त होता. दुखापतीतून पूर्णपणे सावरु न शकल्याने 34 वर्षीय हॅरीने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळायचा. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला मागील आयपीएल मोसम खेळता आला नव्हता. (England Bowler Harry Gurney Retires All format Of Cricket Due To shoulder injury)

24 वर्ष क्रिकेट माझा श्वास, माझ्या निवृत्तीची वेळ आलीय…

मी 10 वर्षांचा असताना हातात बल पकडला तो आजतागायत… आता माझ्या निवृत्तीची वेळ आलीय. खांद्याच्या दुखापतीतून सावरण्याचा मी प्रयत्न केला मात्र मी सावरु शकलो नाही. याचमुळे माझ्या करिअरला पूर्णविराम द्यावा लागतोय. 24 वर्ष मी क्रिकेट खेळलो. क्रिकेट माझा श्वास आहे. माझ्यासाठी हा प्रवास अतिशय शानदार राहिला.

गर्नीची क्रिकेट कारकीर्द

जागतिक टी 20 क्रिकेटमध्ये ख्यातनाम दर्जाचा गोलंदाज म्हणून गर्नीचं नाव राहिलं. गर्नीने इंग्लंडच्या टी 20 ब्लास्ट, आयपीएलसह बीबीएलस टी -20 लीगमध्येही भाग घेतला. खरं तर इंग्लंडसाठी त्याने फार मॅचेस खेळल्या नाहीत, त्याची कारकीर्द अल्प स्वरुपाची राहिली. इंग्लिड संघाकडून त्याने 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 बळी घेतले तर 2 टी -20 सामन्यात 3 विकेट त्याच्या खात्यात आहेत.

गर्नी टी 20 स्पेशालिस्ट बोलर

डावखुऱ्या गर्नीचं आंतरराष्ट्रीय करिअर भलेही फार काळाचं नव्हतं पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो हिरा होता. त्याने 103 फर्स्ट क्साल मॅचेसमध्ये 310 विकेट्स मिळवल्या. तर जगभरातील टी 20 लीगमध्ये 156 मॅचेसमध्ये 190 विकेट्स घेतल्या

गर्नीने कोलकात्याकडून दाखवला दम

जगातील सगळ्यात लोकप्रिय स्पर्धा असलेल्या आयपीएलमध्येही गर्नीने आपला खेळ दाखवला. त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. 2019 च्या आयपीएल मोसमात त्याने कोलकात्याकडून 8 सामने खेळले ज्यात त्याने 7 विकेट्स मिळवल्या.

(England Bowler Harry Gurney Retires All format Of Cricket Due To shoulder injury)

हे ही वाचा :

इंग्लंड दौऱ्यात हार्दिकला डच्चू, निवड समितीच्या माजी सदस्याकडून समर्थन, म्हणाला, ‘जर खेळायचं असेल तर…’

India Tour England 2021 | इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.