Video : दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन, जोफ्रा आर्चरचा डोकं फोडणारा बाऊन्सर, बॅट्समन थोडक्यात वाचला!

केंटविरुद्ध आर्चरचं खतरनाक रुप पाहायला मिळालं. आर्चरने जुन्या अंदाजात बोलिंग टाकून प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरवली. मॅचदरम्यान टाकलेल्या एका बाऊन्सरने बॅट्समन थोडक्यात वाचला. (England Bowler Jofra Archer Bouncer Fortunately batsman not injured)

Video : दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन, जोफ्रा आर्चरचा डोकं फोडणारा बाऊन्सर, बॅट्समन थोडक्यात वाचला!
जोफ्रा आर्चरचा घातक बाऊन्सर...
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 10:26 AM

मुंबई : दुखापतीतून सावरल्यानंतर इंग्लंडचा घातक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) पुन्हा जुन्या लयीत दिसत आहे. त्याच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघातील बॅट्समन हैरान असतात. काऊंटी चॅम्पियनशीपदरम्यान ससेक्सकडून खेळताना केंटविरुद्ध त्याने असा एक घातक बाऊन्सर टाकला की त्या बाऊन्सरने बॅट्समनचं डोकं फुटलं असतं पण बॅट्समनच्या चतुराईने तो थोडक्यात वाचला आणि पुढील अनर्थ टळला. (England Bowler Jofra Archer Bouncer Fortunately batsman not injured)

दुखापतीनंतर आर्चरचं शानदार पुनरागमन

दुखापतीनंतर आर्चरने शानदार पुनरागमन केलं आहे. ससेक्सकडून केंटविरुद्ध खेळताना त्याने 13 ओव्हर्समध्ये 2 रन्स देऊन 2 विकेट्स मिळवल्या. आर्चरने जॉक क्राऊली आणि केंटचा कर्णधार बेल डूमंड या दोन फलंदाजांना बाद करुन केंटच्या टीमला 145 रन्सवर ऑलआऊट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

“आता माझा फिटनेस चांगला आहे. फिटनेसविषयी सध्या कोणताही त्रास नाही. आपल्या परफॉर्मन्सने संघाला त्याचा फायदा होतो, ही भावना चांगली असते. पुनरागमन केल्यानंतर खेळलेल्या सामन्यामुळे आत्मविश्वास आला आहे”, अशी प्रतिक्रिया जोफ्रा आर्चरने दिली आहे.

आर्चरच्या बाऊन्सरपुढे बॅट्समन थोडक्यात वाचला

केंटविरुद्ध आर्चरचं खतरनाक रुप पाहायला मिळालं. आर्चरने जुन्या अंदाजात बोलिंग टाकून प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरवली. मॅचदरम्यान टाकलेल्या एका बाऊन्सरने बॅट्समन थोडक्यात वाचला. आर्चरने वेगाने टाकलेला बाऊन्सर खेळण्यात बॅट्समन जॅक लॅनिंगला अपयश आलं. त्याने क्षणार्धात पीचवर बैठक मारली आणि बॉलला कीपरकडे जाऊ दिलं. लॅनिंगच्या चतुराईने त्याला बॉल लागला नाही. जर लॅनिंगने योग्य वेळी पोझिशनमध्ये आला नसता तर त्याच्या डोक्याला वाऱ्याच्या वेगाने असणारा बाऊन्सर बॉल लागला असता.

दुखापतीमुळे आर्चर आयपीएलला मुकला

आर्चरच्या हाताला दुखापत झाल्याने तो यंदाच्या आयपीएल मोसमाला मुकला. भारताविरुद्ध 5 व्या टी ट्वेन्टी सामन्यानंतर त्याला दुखापतीमुळे क्रिकेटपासून काही दिवस लांब राहावं लागलं. हातावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो पुन्हा मैदानात परतला आहे.

(England Bowler Jofra Archer Bouncer Fortunately batsman not injured)

हे ही वाचा :

महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावरुन हटवल्यानंतर रमण आक्रमक, गांगुली-द्रविडला लिहिलं सणसणीत पत्र, मोठा वाद होण्याची शक्यता!

इंग्लंडच्या टी ट्वे्न्टी स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाजाचा क्रिकेटला ‘गुडबाय’, सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा

इंग्लंड दौऱ्यात हार्दिकला डच्चू, निवड समितीच्या माजी सदस्याकडून समर्थन, म्हणाला, ‘जर खेळायचं असेल तर…’

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.