भारताविरुद्धच्या मालिकेअगोदर इंग्लंडला मोठा धक्का, हा स्टार खेळाडू संघाबाहेर!

इंग्लंडचा स्टार वेगवान बोलर जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. (England Bowler Jofra Archer out test Series Against india Over Right Hand Surgery )

भारताविरुद्धच्या मालिकेअगोदर इंग्लंडला मोठा धक्का, हा स्टार खेळाडू संघाबाहेर!
इंग्लंडचा स्टार वेगवान बोलर जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही.
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 6:56 AM

मुंबई : भारताविरुद्धच्या मालिकेअगोदर इंग्लंडला (India vs England) मोठा धक्का बसलेला आहे. इंग्लंडचा स्टार वेगवान बोलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. नोव्हेंबर महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळेही जोफ्रा आर्चर मालिकेतील शेवटच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. आता पुन्हा एकदा कोपराच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेला जोफ्रा आर्चरला मुकावं लागणार आहे. आर्चरसंबंधी जरी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी त्याच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे तो खेळणार नसल्याचं जवळपास निश्चित आहे. जोफ्रा आर्चर संघात नसणं हा इंग्लंडसाठी फार मोठा धक्का असणार आहे. (England Bowler Jofra Archer out test Series Against india Over Right Hand Surgery )

आर्चरवर शस्त्रक्रिया

जोफ्रा आर्चरच्या उजव्या कोपरावर आज (शुक्रवार) शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे इथून पुढचे काही आठवडे त्याला खेळता येणार नाही. शस्त्रक्रियेनंतरचे काही आठवडे त्याला सक्तीचा आराम करावा लागणार आहे. अशातच भारताविरुद्ध 4 ऑगस्टपासून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्यात तो खेळताना दिसणार नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांतूनही तो बाहेर पडला आहे.

आयपीएलमध्येही खेळला नाही

आर्चरच्या हाताला दुखापत झाल्याने तो यंदाच्या आयपीएल मोसमाला मुकला. स्पर्धा सुरु होण्याअगोदर त्याने स्पर्धेतून माघार घेतली होती. भारताविरुद्ध 5 व्या टी ट्वेन्टी सामन्यानंतर त्याला दुखापतीमुळे क्रिकेटपासून काही दिवस लांब राहावं लागलं.

काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये पुनरागमन

हातावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याने पुन्हा मैदानात पुनरागमन केलं होतं. काऊंटी चॅम्पियनशीपदरम्यान ससेक्स संघातून तो खेळला. दुखापतीतून सावरल्यानंतर तो पुन्हा जुन्या लयीत दिसला.

दुखापतीनंतर आर्चरने शानदार पुनरागमन केलं आहे. ससेक्सकडून केंटविरुद्ध खेळताना त्याने 13 ओव्हर्समध्ये 2 रन्स देऊन 2 विकेट्स मिळवल्या. आर्चरने जॉक क्राऊली आणि केंटचा कर्णधार बेल डूमंड या दोन फलंदाजांना बाद करुन केंटच्या टीमला 145 रन्सवर ऑलआऊट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पण त्याच सामन्यात पुन्हा आर्चरचा कोपरा दुखायला लागला आणि त्याने उर्वरित सामन्यांत माघार घेतली.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव

(England Bowler Jofra Archer out test Series Against india Over Right Hand Surgery)

हे ही वाचा :

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.