Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

23 रन्सवर सगळा संघ ऑलआऊट, भले भले दिग्गज गारद, 5 खेळाडू शून्यावर आऊट!, वाचा त्या मॅचबद्दल…

एक अशी मॅच की ज्या मॅचमध्ये प्रेक्षकांना धावांचा पाऊस पाहायला मिळण्याऐवजी विकेट्सची रीघ पाहायला मिळाली. (England County Championship Yorkshire Lowwest Score Against Hampshire On this Day)

23 रन्सवर सगळा संघ ऑलआऊट, भले भले दिग्गज गारद, 5 खेळाडू शून्यावर आऊट!, वाचा त्या मॅचबद्दल...
Yorkshire vs Hampshire
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 10:19 AM

मुंबई : एक अशी मॅच की ज्या मॅचमध्ये प्रेक्षकांना धावांचा पाऊस पाहायला मिळण्याऐवजी विकेट्सची रीघ पाहायला मिळाली. जर बॅट्समन 10-20 रन्स करुन जर तंबूत परतला तर त्याच्यावर सडकून टीका होते. तो मॅचमध्ये फ्लॉप ठरला, अशी चर्चा होते. खेळाडूला ट्रोल केलं जातं. पण जर संपूर्ण संघच 23 रन्सवर ऑलआऊट झाला तर…! क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाही, असं म्हटलं जातं. त्याच प्रत्यय खरं तर त्यादिवशी आला! आम्ही तुम्हाला सांगतोय यॉर्कशायर आणि हॅम्पशायर (Yorkshire vs Hampshire) यांच्यात पार पडलेल्या सामन्याबद्दल (England County Championship Yorkshire Lowest Score Against Hampshire On this Day)

19 आणि 20 मे 1965 रोजी यॉर्कशायर आणि हॅम्पशायर यांच्यात हा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना यॉर्कशायरने 44.5 षटकांत सर्वबाद 121 धावा केल्या. ट्रुमनने सर्वाधिक 55 धावांचे योगदान देऊन संघाची लाज वाचवली. कारण एका वेळी टीमच्या सात विकेट्स 47 धावांवर गेल्या होत्या. दुसरा सर्वाधिक स्कोअर 22 रन्स होता जो हटनने केला. हॅम्पशायरकडून, शॅकल्टनने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या, तर उर्वरित चार फलंदाज कोट्टमने तंबूत पाठवले.

दिग्गज खेळाडूंचा भरणा पण…

यानंतर हॅम्पशायरने पहिल्या डावात 125 धावा केल्या. सलामीवीर आरई मार्शलने सर्वाधिक 51 धावांचे योगदान दिले. आता योर्कशायरच्या दुसऱ्या डावाची वेळ होती. हा डाव कधी सुरु झाला आणि कधी संपला हे कुणालाचं कळलं नाही. जसं बॅट्समनना कुणाचं आमंत्रण आलेलं असावं आणि घाई असल्यासारखं त्यांनी केवळ मैदानावर हजेरी लावून तंबूत परतावं, असं खेळ पाहायला मिळाला. केवळ 20.4 षटकांत संपूर्ण संघ 23 धावांवर कोसळला. जेव्हा संघात जॉफ बॉयकोट, हटन, ट्रूमन आणि इलिंगवर्थ यांसारख्या दिग्गज खेळाडू होते.

संघातील पाच खेळाडूंना तर भोपळाही फोडता आला नाही!

संघातील पाच खेळाडूंना तर खातंही उघडता आलं नाही. सर्वाधिक 7 धावा विल्सनच्या बॅटमधून आल्या जो शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला. दोन खेळाडूंनी प्रत्येकी एक रन्स तर एका फलंदाजाने तीन धावा केल्या. बॉयकॉटने 5 धावा केल्या. संघाची पहिली विकेट 7 धावा असताना गेली. याचाच अर्थ यॉर्कशायरने 10 गडी केवळ 16 धावात गमावले. हॅम्पशायरकडून व्हाईटने 6 बळी घेतले. विजयासाठी हॅम्पशायरला अवघ्या 20 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी एकही विकेट न गमावता पूर्ण केले.

(England County Championship Yorkshire Lowest Score Against Hampshire On this Day)

हे ही वाचा :

ठाकरे सरकार हादरवण्यासाठी अनिल देशमुखांवरील FIR मध्ये ‘ते’ मुद्दे, हायकोर्टात CBI चा प्रतिदावा काय?

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.