IND vs ENG | इंग्लंडकडून टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न, व्हीडिओ व्हायरल

India vs England 4th Test | इंग्लंड क्रिकेट टीम चौथ्या कसोटीत मजबूत स्थितीत आहे. तर टीम इंडियाला संघर्ष करतेय. अशात इंग्लंडने टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.

IND vs ENG | इंग्लंडकडून टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न, व्हीडिओ व्हायरल
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 5:21 PM

रांची | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात झारखंडमधील जीएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये चौथा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने निराशा केली. रोहित शर्मा इंग्लंड विरुद्ध पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रोहित या मालिकेत सहाव्यांदा झटपट आऊट झाला. टीम इंडियाच्या चाहत्यांना रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहितला चाहत्यांचा अपेक्षेवर खरं उतरता आलं नाही.

रोहित शर्मा स्वसतात माघारी परतला. रोहित शर्मा याला जेम्स एंडरसन याने भारतीच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये आऊट केलं. जेम्सने चौथ्या बॉलवर रोहितला आपल्या जाळ्यात फसवलं. जेम्सने रोहितला विकेटकीपर बेन फोक्स याच्या हाती कॅच आऊट केलं. रोहितने तिसऱ्या कसोटीत निर्णायक क्षणी शतक ठोकून भारताला मजबूत स्थितीत आणलं. मात्र चौथ्या सामन्यात रोहितलं तसं काही करता आलं नाही.

हे सुद्धा वाचा

रोहित आऊट होऊन मैदानाबाहेर जाताना इंग्लंड क्रिकेट टीमच्या चाहत्यांनी जे काही केलंय, ते सोशल मीडियावर व्हायरल झालंय. इंग्लंडच्या चाहत्यांनी या व्हीडिओद्वारे भारतीय क्रिकेट चाहत्यांना जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित आऊट झाल्यानंतर डगआऊटच्या दिशेने जात असताना इंग्लंडच्या समर्थकांनी रोहितला बाय बाय केलं. या चाहत्यांनी एका प्रकारे रोहितची खिल्लीच उडवली. इंग्लड बार्मी आर्मी या ट्विटर हँडलवरुन हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

इंग्लंड बार्मी आर्मीकडून रोहितच्या विकेटचा जल्लोष

रोहितची इंग्लंड विरुद्धची कामगिरी

दरम्यान रोहितच्या तिसऱ्या कसोटीतील शतकाचा अपवाद वगळता त्याला या मालिकेत फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. रोहितने इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत गेल्या 7 डावांमध्ये अनुक्रमे 24, 39, 14, 13, 131, 19 आणि आता 2 अशा धावा केल्या आहेत.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.