Icc World Cup 2023 | वर्ल्ड कप 2023 साठी स्टार खेळाडू निवृत्तीचा निर्णय मागे घेणार!

Icc World Cup 2023 | आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीमचा दिग्गज खेळाडू हा निवृत्तीचा निर्णय मागे घेत कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.

Icc World Cup 2023 | वर्ल्ड कप 2023 साठी स्टार खेळाडू निवृत्तीचा निर्णय मागे घेणार!
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 11:54 PM

मुंबई | इंग्लंड क्रिकेट टेस्ट कॅप्टन आणि स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स याच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अवघ्या काही दिवसांवर आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा येऊन ठेपली आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी बेन स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय मागे घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. बेन स्टोक्स याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला, तर इंग्लंड टीमसाठी ही निश्चितच गूड न्यूज असेल.

इंग्लंडने 2019 चा वर्ल्ड कप जिंकला होता. इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देण्यात बेन स्टोक्स याने निर्णायक भूमिका बजावली होती. स्टोक्सला वनडे क्रिकेटमध्ये तगडा आणि दांडगा अनुभव आहे. त्यामुळे स्टोक्सने निवृत्तीचा निर्णय फिरवला तर इंग्लंडला निश्चितच फायदा होईल. बेन स्टोक्स जुलै 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध अखेरचा वनडे सामना खेळला होता.

‘बेन स्टोक्स यू टर्न घ्यायला तयार आहे. स्टोक्स वनडे वर्ल्ड कपमधून कमबॅक करत इंग्लंडला भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत मदत करेल’, असं टेलीग्राफच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तसेच स्टोक्स वर्ल्ड कपमध्ये खेळला तर त्याला आयपीएल 17 व्या मोसमाला मुकावं लागू शकतं.

बेन स्टोक्स हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स टीमसोबत करारबद्ध आहे. बेन स्टोक्स आयपीएलमधून मिळणाऱ्या 16 कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागू शकतं. त्याच कारण आपण जाणून घेऊयात. वर्ल्ड कप 2023 ची नोव्हेंबरमध्ये सांगता होणार आहे. त्यानंतर इंग्लंड भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 25 जानेवारी ते 11 मार्च दरम्यान करण्यात आलं आहे. तर यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात आयपीएल सुरु होईल. त्यामुळे स्टोक्सला 5 महिने भारतात थांबाव लागेल.

बेन स्टोक्स याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. आयपीएल दरम्यान बेन स्टोक्स ही शस्त्रक्रिया करणार असल्याचं समजत आहे. त्यामुळे स्टोक्सला इंग्लंडसाठी खेळायचं झाल्यास आयपीएलमधून माघार घ्यावी लागू शकते. त्यामुळे एका बाजूला इंग्लंडसाठी गूड आणि सीएसकेसाठी बॅड न्यूज आहे. आता बेन स्टोक्स येत्या काळात काय निर्णय घेतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.