T20 World Cup 2024 आधी क्रिकेटरचा मोठा निर्णय! सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
Cricket News: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला अवघे काही तास शिल्लक असताना स्टार ऑलराउंडरची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. सर्व 20 संघांनी जोरदार तयारी केली आहे. या संघांची तयारी झाली आहे. सर्व संघ आता साखळी फेरीतील सामन्यांसाठी सज्ज झाले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही तास बाकी असताना स्टार ऑलराउंडरच्या सोशल मीडिया पोस्टची एकच चर्चा पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर ख्रिस वोक्स टी 20 वर्ल्ड कप टीमचा सदस्य नाही. ख्रिस वोक्सने क्रिकेटपासून दूर असल्याचं कारण हे सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे.
ख्रिस वोक्सने सोशल मीडियाद्वारे आपलं दु:ख जाहीर केलं आहे. ख्रिसने आपण क्रिकेटपासून दूर असण्याच्या निर्णयाचं स्पष्टीकरण दिलं आहे. “गेला मे महिना माझ्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक राहिला.दुर्देवाने माझ्या वडिलांचं मे महिन्यातील सुरुवातीच्या आठवड्यात निधन झालं”, असं वोक्सने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय. वोक्स कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना वोक्सने आपल्या घरातील सदस्यांसह राहण्याचा निर्णय घेतला. “आम्ही सर्व दु:खात आहोत. आयुष्यातील सर्वात अवघड क्षणांचा सामना करत आहोत”, असं वोक्सने म्हटलंय.
वोक्स क्रिकेटपासून दूर
ख्रिस वोक्सने अशा वेळेत क्रिकेटपेक्षा कुटुंबियांना प्राधान्य दिलं. वोक्स यावेळेस या हंगामात वार्कविकशायरकडूनही खेळला नाही. तसेच वोक्स आयपीएलच्या 17 व्या मोसमात पंजाब किंग्ससाठीही खेळला नाही. त्यामुळे ख्रिस वोक्सने टी 20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टीमपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
ख्रिस वोक्स याची सोशल मीडिया पोस्ट
— Chris Woakes (@chriswoakes) May 31, 2024
ख्रिस वोक्सची क्रिकेट कारकीर्द
ख्रिस वोक्सने इंग्लंडचं 48 कसोटी, 122 वनडे आणि 33 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. वोक्सने कसोटी, वनडे आणि टी 20 फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 1 हजार 754, 1 हजार 524 आणि 146 धावा केल्या आहेत. तसेच वोक्सने टेस्टमध्ये 31, वनडेत 173 आणि टेस्टमध्ये 149 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंड टी 20 वर्ल्ड कप गतविजेता आहे. इंग्लंडने 2022 साली वर्ल्ड कप जिंकला होता. वोक्स या टीमचा सदस्य होता. तसेच वोक्स वनडे वर्ल्ड कप 2019 च्या विजयी संघाचाही सदस्य होता.