Prithvi Shaw | पृथ्वी शॉ याची वनडे कपमध्ये डबल सेंच्युरी, इंग्लंडमध्ये सौरव गांगुली याची ‘दादागिरी’ थांबवली
Prithvi Shaw Double Century | पृथ्वी शॉ याने 81 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. तर त्यानंतर पुढील 48 चेंडूत पृथ्वी शॉ याने फटकेबाजी करत द्विशतक पूर्ण केलं.
नॉर्थहॅम्पटन | इंग्लंडमध्ये खेळवण्यात येत असलेल्या डोमेस्टिक वनडे कप 2023 स्पर्धेत टीम इंडियाच्या पृथ्वी शॉ याने धमाका केलाय. नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळताना पृथ्वीने सोमरसेट विरुद्ध द्विशतक ठोकण्याचा कारनामा केलाय. पृथ्वीने वादळी खेळी करत हे वेगवान डबल सेंच्युरी ठोकलीय. पृथ्वीने फक्त 129 बॉलमध्ये द्विशतक ठोकलं. या द्विशतकात पृथ्वीने 24 चौकार आणि 8 सिक्स खेचले. पृथ्वीने शतक हे 81 बॉलमध्ये पूर्ण केलं. तर त्यांनतर पृथ्वीने पुढील शंभर धावा या फक्त 48 बॉलमध्ये पूर्ण केल्या. पृथ्वीने हे द्विशतक लिस्ट ए क्रिकेटमध्ये केलंय.
पृथ्वीची ऐतिहासिक कामगिरी
पृथ्वीने या द्विशतकासह इतिहास रचला आहे. पृथ्वी इंग्लंडमध्ये डबल सेंच्युरी करणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी भारताकडून सौरव गांगुली याने श्रीलंका विरुद्ध 183 रन्सची खेळी केली होती. तर दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी 1983 सालच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विक्रमी आणि निर्णायक 175 धावांची नाबाद खेळी साकारली होती.
पृथ्वी शॉ याचा सुपर शो, इंग्लंडमध्ये डबल सेंच्युरी
44.2 | Gardenssssss! ?
Prithvi sends it out of Wantage Road for his NINTH six! ?
Steelbacks 355/2.
Watch live ? https://t.co/CU8uwteMyd pic.twitter.com/Qvyr486AEp
— Northamptonshire CCC (@NorthantsCCC) August 9, 2023
पृथ्वीने 153 बॉलमध्ये 28 फोर आणि 11 खणखणीत सिक्सच्या मदतीने 244 धावांची ऐतिहासिक खेळी केली. पृथ्वीच्या या खेळीच्या जोरावर नॉर्थहॅम्प्टनशायर टीमने 400 पार मजल मारली. नॉर्थहॅम्प्टनशायरने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 415 धावा केल्या. त्यामुळे समरसेटला 416 धावांचं अवघड आव्हान दिलं आहे.
दरम्यान पृथ्वीने 4 ऑगस्ट रोजी ग्लुसेस्टरशायर विरुद्ध इंग्लंड क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. इंग्लंड क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच सामन्यात पृथ्वीने 35 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह 34 धावांची खेळी केली. मात्र पृथ्वी आपल्या पहिल्याच सामन्या दुर्देवीरित्या आऊट झाला. पृथ्वी या सामन्यात हिट विकेट आऊट झाला होता.
नॉर्थहॅम्प्टनशायर प्लेईंग इलेव्हन | लुईस मॅकमॅनस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, एमिलियो गे, रिकार्डो वास्कोनसेलोस, सॅम व्हाइटमन, ल्यूक प्रॉक्टर, रॉब केओघ, टॉम टेलर, जस्टिन ब्रॉड, सायमन केरिगन आणि जॅक व्हाईट.
समरसेट प्लेईंग इलेव्हन | जॉर्ज थॉमस, अँड्रयू उमेद, लुईस गोल्डस्वर्थी, जेम्स रिव, शॉन डिक्सन, जॉर्ज बार्टलेट, कर्टिस कॅम्फर, डॅनी लॅम्ब, नेड लिओनार्ड, जॅक ब्रूक्स आणि शोएब बशीर.