IND vs ENG 2nd Test | दुसऱ्या कसोटीआधी टीमला झटका, आता हा खेळाडू बाहेर!
India vs England 2nd Test | केएल राहुल आणि रवींद्र जडेजा हे दोघे दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. अशातच आता टीमला मोठा झटका लागला आहे. नक्की काय झालं?
मुंबई | इंग्लंडने हैदराबादमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर मात करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने बॅटिंग आणि बॉलिंग दमदार करुनही पराभूत व्हावं लागलं. पराभव झाला नाही, त्यात केएल राहुल आणि रवींद्र जडेजा हे दोघे दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाले. या दोघांऐवजी टीम इंडियात वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि सरफराज खान या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. उभयसंघातील दुसरा कसोटी सामना हा विशाखापट्टणम येथे होणार आहे. त्याआधी टीमला आणखी एक झटका बसला आहे.
इंग्लंडच्या हॅरी ब्रूक याने वैयक्तिक कारणामुळे या या 5 सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली. इंग्लंडसाठी हा मोठा धक्का होता. इंग्लंड या धक्क्यातून सावरत नाही, तोवर दुसरा झटका लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पिनर जॅक लीच हा दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. जॅक लीचला पहिल्या कसोटी दरम्यान दुखापत झाली होती.
जॅक लीच इंग्लंडचा कसोटी टीममधील सर्वात अनुभवी स्पिनर आहे. लीचला सामन्यादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली, त्यामुळे त्याला फार त्रास जाणवत होता. त्यामुळे लीच दुसऱ्या सामन्यातून बाहेर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच लीच दुसऱ्या कसोटीआधी सरावासाठी सहकाऱ्यांसह न आल्याने ही भीती खरीच ठरण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
लीचची पहिल्या कसोटीतील कामगिरी
दरम्यान जॅक लीच याने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 26 ओव्हरमध्ये 63 धावांच्या मोबदल्यात एकमेव मात्र रोहित शर्माची महत्त्वाची विकेट घेतली. तर दुसऱ्या डावात दुखापतीमुळे त्याला 10 ओव्हरच टाकता आल्या. लीचने 33 धावा देऊन 1 विकेट घेतली.
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.