World Cup 2023 | इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याच्यावर रस्त्यावर दाढी करण्याची वेळ

Michael Vaughan Shaving At Roadside Salon | मायकल वॉर्न याचा मुंबईतील रस्त्यावर दाढी करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. वॉर्नच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहा नेटकऱ्यांनी काय काय म्हटलंय.

World Cup 2023 | इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याच्यावर रस्त्यावर दाढी करण्याची वेळ
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 6:37 PM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील साखळी फेरी पूर्ण झाली आहे. 10 पैकी 6 संघांचं साखळी फेरीनंतर पॅकअप झालंय. तर टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. या वर्ल्ड कपमधील पहिली सेमी फायनल मॅच ही 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. न्यूझीलंड आणि टीम इंडिया या सामन्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. दोन्ही संघ या मोठ्या सामन्यासाठी सज्ज आहेत. क्रिकेट चाहतेही उत्सुक आहेत.

पहिल्या सेमी फायनलआधी इंग्लंड क्रिकेट टीमचा माजी कर्णधार मायकल वॉन याने आपला एक फोटो सेल्फी सोशल मीडिया एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. मायकलने रस्त्यावर दाढी करतानाचा फोटो शेअर केला आहे. मायकलचा हा रोडसाईड स्पेशल दाढी फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. क्रिकेट चाहत्यांना मायकलच्या या फोटोवर अनेक कमेंट्स केल्या आहेत.

मायकल वॉन याची पोस्ट

मायकलने मुंबईतील ऑर्मिस्टन रोडवरील पादचारी मार्गवर दाढी केली. “सोमवारी माझा चांगला मित्र दिन्जयाल (दिनदयाल) यांच्यासोबत ऑर्मिस्टन रोडवर शेविंग डे आहे, मुंबई”, असं मायकलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

दाढी आणि मित्रासोबत सेल्फी

वॉनच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

“वॉनचं भारतावर विशेष प्रेम आहे. वॉनने या प्रेमातूनच मुंबईतील रस्त्यावर दाढी करण्याचा निर्णय घेतला आहे”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर काही नेटकऱ्यांनी वॉनला त्याची चूक लक्षात आणून दिली आहे. त्या नाभिकाचं नाव दिन्जयाल नाही, तर दिनदयाल असं आहे, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. वॉनने आपल्या पोस्टमध्ये नाभिकाचं नावाचा उल्लेख करताना ‘दिन्जयाल’ असं लिहिलंय.

वर्ल्ड कप सेमी फायनलबाबत थोडक्यात

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यानंतर दुसरा सेमी फायनल सामना हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. हा सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील ईडन गार्डन इथे आयोजित करण्यात आला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.