Video : सर्वकाही व्यवस्थित असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टाकू लागला ‘स्पिन’, काय झालं नेमकं

इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तिसरा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानात सुरु आहे. तीन सामन्यांची मालिका इंग्लंडने आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विचित्र प्रकार पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाजावर फिरकी गोलंदाजी करण्याची वेळ आली. मैदानात असं काय घडलं ते जाणून घ्या.

Video : सर्वकाही व्यवस्थित असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टाकू लागला 'स्पिन', काय झालं नेमकं
Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 8:47 PM

क्रिकेटमध्ये कधीही न पाहिलेल्या घडामोडी घडल्या की आश्चर्य वाटतं. कधी विकेटकीपरने गोलंदाजी केली आश्चर्याचा धक्का बसतो. कधी कधी पार्ट टाईम बॉलर मध्यम गतीने किंवा फिरकी गोलंदाजी करताना दिसतात. पण प्रवाहातील मुख्य गोलंदाज असं काही करताना दिसला तर आश्चर्य वाटतं. वेगवान गोलंदाज फिरकी गोलंदाजी करताना पाहणं कधी कधीच होतं. अशीच एक घडामोड श्रीलंका आणि इंग्लंड कसोटी सामन्यात घडली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सला फिरकी गोलंदाजी करणं भाग पडलं. असं नाही की त्याच्या गोलंदाजीवर चौकार षटकार मारले होते. त्याला दुखापतही झाली नव्हती. त्यामुळे त्याने असं करण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा संघ फलंदाजीसाठी उतरला होता. दुसऱ्या सत्रातील खेळ सुरु होईन फक्त अर्धा तास उलटला होता. पण त्याचवेळी मैदानावर ढगांचं सावट आलं आणि पंचांनी दखल घ्यावी लागली. तेव्हा ख्रिस वोक्स गोलंदाजी करता होता आणि दोन चेंडू टाकून झाले होते. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज दिमुथ करुणारत्ने धावचीत झाला होता.

खरं तर मैदानातील प्रकाश कमी झाला की पंच खेळाडूंना तंबूत परतण्याचे आदेश देतात किंवा खेळ सुरु ठेवण्यासाठी फक्त फिरकीपटूंना गोलंदाजी करण्याचे स्पष्ट आदेश देतात. कारण वेगवान गोलंदाजांचा सामना करताना फलंदाजांना त्रास होऊ शकतो. हाच पर्याय पंचांनी इंग्लंडचा कर्णधार ऑली पोप समोर ठेवला आणि तो यासाठी तयार झाला. इंग्लंडकडे शोएब बशीर आणि जो रूट हे फिरकीपटू होते. पण षटक मध्येच दुसऱ्याकडने न सोपवता पोपने वोक्सला उर्वरित चार चेंडू फिरकी टाकण्यास सांगितले. वोक्सने कर्णधाराचं म्हणणं ऐकलं आणि उर्वरित चार चेंडू ऑफ स्पिन टाकले. त्यात एका चेंडूवर चौकार आला आणि एकूण पाच धावा आल्या.

ख्रिस वोक्सला फिरकी गोलंदाजी करताना पाहून मैदानात एकच हास्यकल्लोळ झाला. ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या इंग्लंडचा नियमित कर्णधार बेन स्टोक्सनेही डोक्यावर हात मारला. पण ख्रिस वोक्सच्या फिरकीचा आनंद प्रेक्षकांनी लुटला. वोक्सचं षटक संपताच मैदानात पुन्हा एकदा प्रकाश पडला आणि पुन्हा वेगवान गोलंदाजी सुरु झाली. वोक्सला याचा फायदा काही अंशी झाला असंच म्हणावं लागेल. कारण त्याने दोन षटकानंतर कुसल मेंडिसची विकेट काढली.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.