IPL च्या उर्वरित मॅचमध्ये चेन्नईला फटका तर धोनीला झटका बसणार?, कसा तो पाहा…
बहुतेक देशांतील खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याची चर्चा आहे. याचा मोठा फटका चेन्नईला (Chennai Super Kings) बसणार आहे. त्यामुळे चेन्नईला फटका तर धोनीला झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या (IPL 2021) चौदाव्या पर्वातील उरलेल्या मॅचेस 19 किंवा 20 सप्टेंबर रोजी सुरू होण्याची शक्यता आहे. स्पर्धेतील उर्वरित 31 मॅचेस संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईत खेळवल्या जाणार आहेत तसंच जगातील सगळ्यात लोकप्रिय टी-ट्वेंटी स्पर्धा अर्थात आयपीएलची फायनल मॅच 10 ऑक्टोबरला खेळविण्याचं नियोजन आहे. बीसीसीआय लवकरच ही घोषणा करण्याचा तयारीत आहे परंतु सध्याच्या परिस्थितीत आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंचा सहभाग हा महत्त्वाच मुद्दा बनला गेलाय. बहुतेक देशांतील खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याची चर्चा आहे. याचा मोठा फटका चेन्नईला (Chennai Super Kings) बसणार आहे. त्यामुळे चेन्नईला फटका तर धोनीला झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. (England Player may Be not Available For CSK IPL 2021)
इंग्लंडचे खेळाडू IPL मध्ये भाग घेणार नाहीत?
आयपीएलच्या काही दिग्गज टीममध्ये इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार आयपीएलच्या उर्वरित मॅचेसमध्ये इंग्लंडचे खेळाडू भाग घेणार नाहीत. त्यामुळे दिग्गज संघांना मोठा धक्का बसणार आहे.
सॅम करन आणि मोईन अली आऊट होणार?
चेन्नईचे दोन महत्वपूर्ण खेळाडू आयपीएल खेळणार नाहीत, अशी चर्चा आहे. चेन्नई सुपर किंग्जचे दोन असे खेळाडू की ते संघात असल्यानंतर संघाला एक प्रकारचं संतुलन येतं. ते खेळाडू म्हणजे इंग्लंडचा सॅम करन आणि मोईन अली.. सॅम करन असा अष्टपैलू खेळाडू आहे जो बॅटच्या साहाय्याने रन्स करु शकतो आणि अप्रतिम बोलिंगच्या बळावर प्रतिस्पर्धी संघांच्या विकेट मिळवू शकतो. मोईन अलीकडेसुद्धा हीच जादू आहे. मोईन अली सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये येऊन फटकेबाजी करतो तर आपल्या फिरकीच्या जाळ्यात अनेक दिग्गजांना ओढतो.
..तर चेन्नईला मोठा फटका तर धोनीला झटका!
सॅम आणि मोईनने यावर्षीच्या आयपीएल हंगामात चेन्नईसाठी उपयुक्त खेळी केल्या आहेत. चेन्नईसाठी हे दोन खेळाडू किती गरजेचे आहेत, हे त्यांनी त्यांच्या 14 व्या पर्वातील परफॉर्मन्सने सिद्ध केलंय.जर आयपीएलच्या उर्वरित मॅचेस मध्ये सीएसकेकडून हे दोन खेळाडू खेळू शकले नाहीत तर चेन्नईला मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागणार आहे आणि धोनीसाठी हा मोठा झटका असणार आहे.
चेन्नईचे सीईओ काय म्हणाले…?
याच विषयी चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथ यांना विचारलं असता ते म्हणाले, जर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पाठवले नाहीत तर आपण काहीच करू शकत नाही. अशा परिस्थितीत आम्हाला दोन महत्त्वपूर्ण खेळाडूंशिवाय खेळावं लागेल. परंतु अद्याप कुणाचंही ऑफिशियली स्टेटमेंट आलेलं नाही. सध्या केवळ चर्चा आहेत.
इंग्लंडची भूमिका काय?
दुसरीकडे इंग्लंड टीमचे मॅनेजिंग डायरेक्टर इश्ले जाईल्स यांनी मात्र वेगळंच वक्तव्य केलंय. आयपीएलच्या उर्वरित सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यांना आराम करण्याची सक्त जरुरत आहे आणि ते आराम करतील, असं ते म्हणाले
(England Player may Be not Available For CSK IPL 2021)
हे ही वाचा :
MS धोनी की विराट कोहली, सर्वोत्तम कर्णधार कोण? इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो…
भारत-इंग्लंड मालिकेत ‘हा’ खेळाडू सर्वांत जास्त रन्स करणार, इंग्लंडच्या दिग्गजाची आणखी एक भविष्यवाणी!
भारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य