ENG vs PAK | इंग्लंडकडून पाकड्यांची जबरदस्त धुलाई, पाकिस्तानसमोर 338 धावांचं आव्हान
England vs Pakistan | इंग्लंड क्रिकेट टीमच्या फलंदाजांनी तोडफोड बॅटिंग केली आहे. इंग्लंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी 338 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
कोलकाता | पाकिस्तान क्रिकेट टीमचं इंग्लंड विरुद्धच्या करो या मरो सामन्यात टॉस गमावताच आव्हान संपुष्टात आलं. टॉस जिंकून इंग्लंडने बॅटिंग घेतली. इंग्लंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. इंग्लंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी 338 धावांचं आव्हान ठेवलं. इंग्लंडने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 337 धावा केल्या. इंग्लंडच्या पहिल्या 6 फलंदाजांनी 25 पेक्षा अधिक धावा केल्या. पाकिस्तानचे गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांसमोर निष्प्रभ ठरले. आता पाकिस्तान या धावांचं यशस्वी पाठलाग करणार की इंग्लंड सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान आठव्या क्रमांकावर संपवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
इंग्लंडची बॅटिंग
इंग्लंडकडून ओपनर डेव्हिड मलान याने 31 धावा केल्या. जॉनी बेयरस्टो याने 59 धावांची अर्धशतकी खेळी केली. अनुभवी जो रुट याने 60 रन्स केल्या. ऑलराउंडर बेन स्टोक्स याने 84 धावा केल्या. कॅप्टन जोस बटलर याने 27 रन्स केल्या. हॅरी ब्रूक याने 30 धावांचं योगदान दिलं. मोईन अली याने 8 रन्स जोडल्या. ख्रिस वोक्स याने नाबाद 4 धावा केल्या. डेव्हिड व्हिली याने 15 धावा जोडल्या. गेस ऍटकिन्सन झिरोवर आऊट झाला. तर आदिल रशीद झिरोवर नाबाद परतला.
पाकिस्तानकडून हरीस रौफ याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. शाहीन अफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनिअर या दोघांनी प्रत्येकी 2-2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर इफ्तिखार अहमद याने 1 विकेट घेतली.
पाकिस्तानचे गोलंदाज निष्प्रभ
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी इंग्लंड विरुद्ध खोऱ्याने धावा लुटवल्या. शाहिन अफ्रिदी, हरीस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर आणि शादाब खान या चौघांनी प्रत्येकी 10 ओव्हर टाकल्या. या चौघांनी अनुक्रमे 72, 64, 74 आणि 57 धावा लुटवल्या. तर इफ्तिखार अहमद याने 7 ओव्हरमध्ये 38 आणि आघा सलमानने 3 ओव्हरमध्ये 25 रन्स दिल्या.
इंग्लंडची जोरदार बॅटिंग
A strong total, well batted lads! 🔥
🏴 3️⃣3️⃣7️⃣-9️⃣#EnglandCricket | #CWC23 pic.twitter.com/pjQtVOElth
— England Cricket (@englandcricket) November 11, 2023
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गेस ऍटकिन्सन आणि आदिल रशीद.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर आणि हरिस रौफ.