ENG vs NED | इंग्लंडकडून नेदरलँड्सला विजयासाठी 340 रन्सचं अवघड आव्हान, स्टोक्सचं शानदार शतक
England vs Netherlands | इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि डेव्हिड मलान या दोघांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंडने या जोरावर नेदरलँड्सला विजयासाठी 340 धावांचं आव्हान दिलंय.
पुणे | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 40 व्या सामन्यात इंग्लंड क्रिकेट टीमने नेदरलँड्सला विजयासाठी 340 धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 339 धावा केल्या. इंग्लंडकडून स्टार ऑलराउंडर बेन स्टोक्स याने सर्वाधिक शतकी खेळी केली. तर डेव्हिड मलान आणि ख्रिस वोक्स या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. या तिघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर इंग्लंडला 330 पार मजल मारता आली. इंग्लंडच्या फलंदाजांनी आपला कॅप्टन जोस बटलर याचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय योग्य ठरवला.
इंग्लंडची बॅटिंग
इंग्लंडकडून बेन स्टोक्स याने 84 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 चौकारांसह 108 धावांची शतकी खेळी केली. डेव्हिड मलान याने 74 चेंडूत 87 धावा केल्या. ख्रिस वोक्सने 45 बॉलमध्ये 51 धावा केल्या. जो रुट याने 28 धावांचं योगदान दिलं. तर जॉनी बेयरस्टो याने 15 आणि हॅरी ब्रूकने 11 धावा केल्या. तर कॅप्टन जॉस बटलर, मोईन अली, डेव्हिड विली या तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. बटलरने 5, अलीने 4 आणि विलीने 6 धावा केल्या. तर गेस ऍटकिन्सन आणि आदिल रशीद ही जोडी नाबाद परतली. गेसने 2 आणि रशीदने 1 धाव केली.
नेदरलँड्सची बॉलिंग
इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीसमोर नेदरलँड्सचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. आर्यन दत्त, बास दी लीडे सारख्या गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. मात्र ते महागडे ठरले. नेदरलँड्सकडून बास दी लिडे याने 10 ओव्हरमध्ये 74 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर आर्यन दत्त आणि वान बीक या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर पॉल व्हॅन मीकरेन याने 1 विकेट घेतली.
इंग्लंडकडून 340 धावांचे आव्हान
We finish our overs in Pune on 3️⃣3️⃣9️⃣
Chris Woakes 51 (45) Dawid Malan 87 (74) Ben Stokes 108 (84)
Well batted, lads 💪#EnglandCricket | #CWC23 pic.twitter.com/OAUBYQTemp
— England Cricket (@englandcricket) November 8, 2023
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गेस ऍटकिन्सन आणि आदिल रशीद.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.