Video : गोलंदाजाचा पाय लाईनच्या आत, विकेटकीपरनेही स्टंपमागे पकडला चेंडू! तरी पंचांनी दिला No Ball, का ते जाणून घ्या
इंग्लंडमध्ये टी20 ब्लास्ट लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत एका सामन्यात विचित्र पद्धतीने नो बॉल दिला गेला. या क्रिकेटच्या नियमामुळे क्रीडाप्रेमीही गोंधळून गेले. हा सामना 5 सप्टेंबरला सॉमरसेट विरुद्ध नॉर्थम्प्टनशायर यांच्यात झाला. विकेटकीपरची एक छोटी चूक महागात पडली.
इंग्लंडच्या टी20 ब्लास्ट लीगमध्ये सॉमरसेट आणि नॉर्थम्प्टनशायर यांच्यात सामना पार पडला. 5 सप्टेंबरला पार पडलेल्या या सामन्यात पंचांनी नो बॉल दिला. त्यामुळे क्रीडारसिक गोधळून गेले. कारण गोलंदाजाने गोलंदाजी करताना कोणतीच चूक केली नव्हती. तर विकेटकीपरनेही चेंडू स्टंपच्या मागे चेंडू पकडला होता. नॉर्थहॅम्प्टनशायरच्या कर्णधाराने 14 वं षटक सैफ झाईबच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टॉम बँटनने षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याची विकेट मिळाली. तिसऱ्या चेंडूवर सीन डीकसनने एक धाव काढली आणि कोल्हेर कॅडमोरला स्ट्राईक दिली. चौथा चेंडू टाकताना सैफने कोणतीच चूक केली नाही. पण विकेटकीपर लुईस मॅकमॅनसने एक चूक भोवली. बॉल स्टंपच्या मागे पकडला आणि कोल्हेर कॅडमोरच्या स्टंपिंगसाठी जोरदार अपील केली. यावेळी चेंडूही मागे पकडला होता. मात्र हा चेंडू पकडता त्याने एक चूक केली होती. त्यामुळे विकेटऐवजी नो बॉल मिळाला. तसेच पुढच्या चेंडूवर षटकार आला.
झालं असं की, विकेटकीपर लुईस मॅकमॅनसने चेंडू पकडण्यापूर्वीच ग्लोव्हज स्टंपच्या पुढे आले होते. त्यानंतर चेंडू स्टंपच्या मागे पकडला.आयसीसीच्या नियमांनुसार, विकेटकीपरने चेंडू पकडण्यासाठी विकेटच्या मागे उभे राहायचं असतं. जोपर्यंत फलंदाजाच्या बॅटने चेंडूला स्पर्श होत नाही किंवा चेंडू स्टंपच्या मागे जात नाही तोपर्यंत विकेटकीपर पुढे येऊ शकत नाही. फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागण्याआधीच विकेटकीपर पुढे आला किंवा ग्लोव्हज पुढे आले तर पंचांना डेड बॉल किंवा नो बॉल देण्याचा अधिकार आहे. अशा स्थितीत स्टंपिंग ग्राह्य धरलं जात नाही.
View this post on Instagram
दोन्ही संघांची प्लेइंग 11
नॉर्थहॅम्प्टनशायर (प्लेइंग इलेव्हन): रिकार्डो वास्कोनसेलोस, जॉर्ज बार्टलेट, सैफ झैब, डेव्हिड विली (कर्णधार), जस्टिन ब्रॉड, ॲश्टन अगर, लुईस मॅकमॅनस (विकेटकीपर), गस मिलर, बेन सँडरसन, फ्रेडी हेल्डरीच, जॅक व्हाइट.
सॉमरसेट (प्लेइंग इलेव्हन): टॉम बँटन (विकेटकीपर), विल स्मीड, टॉम कोहलर-कॅडमोर, टॉम ॲबेल, सीन डिक्सन, लुईस ग्रेगरी (कर्णधार), बेन ग्रीन, क्रेग ओव्हरटन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, जोश डेव्ही, जेक बॉल