IND vs ENG : पाहुणे आले…. कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाचं भारतात आगमन
इंग्लंडचा संघ टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतात पोहोचला आहे. | England team Arrives In Chennai For ENg Vs Ind test Match Series
चेन्नई : इंग्लंडचा संघ (England Team) टीम इंडियाविरुद्धच्या (Team India) मालिकेसाठी भारतात पोहोचला आहे. भारतातल्या आगमनाचा व्हिडिओ इंग्लंड टीमच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये संघाचे सर्व खेळाडू चेन्नईतील हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. (England team Arrives In Chennai For ENg Vs Ind test Match Series)
? Chennai, India@root66 and the team have arrived in India ahead of our four-match Test series ????????? pic.twitter.com/GT06p9Ru4u
— England Cricket (@englandcricket) January 27, 2021
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधात (Team India) तर इंग्लंडने श्रीलंकेविरोधात (England vs Sri Lanka) त्यांच्याच भूमित कसोटी मालिकेत शानदार विजय मिळवला. यामुळे इंग्लंड आणि टीम इंडियाचा विश्वास दुणावला आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रुटसह उर्वरित संघ थेट श्रीलंकेमधून भारतात दाखल झाले आहेत. इंग्लंडच्या संघाने श्रीलंका दौऱ्यावर शानदार प्रदर्शन केले आहे. श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी सामने जिंकण्यात इंग्लंडच्या संघाला यश आले. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शानदार कामगिरी करत दोन्ही कसोटी सामन्यात 100 पेक्षा जास्त धावा केल्या. पहिल्या कसोटीत कर्णधार रुटने डबल सेंच्युरी ठोकली तर दुसर्या कसोटीत त्याने शानदार शतक झळकावले.
इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यापूर्वीच भारतात पोहोचला असून चेन्नईतील एका हॉटेलमध्ये तो क्वारन्टाईन आहे. रुट आणि त्याच्या टीमचं थेट श्रीलंकेहून चेन्नईत आगमन झालं आहे. इंग्लंडच्या संघाने कसोटी मालिकेत श्रीलंकेला 2-0 ने पराभूत केले आहे. त्यामुळे सध्या इंग्लंडचा संघ सातव्या अस्मानावर आहे.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च
पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.
टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कप्तान), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच.
हे ही वाचा :
#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा
England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?