ENG vs NED Live Streaming | नेदरलँड्स इंग्लंड विरुद्ध उलटफेर करणार? सामना कुठे पाहता येणार?
England vs Netherlands Live Streaming | इंग्लंड क्रिकेट टीम पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या अर्थात दहाव्या क्रमांकावर आहे. तर नेदरलँड्स टीम नवव्या क्रमांकावर आहे.
पुणे | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 40 वा सामना हा गतविजेता इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात होणार आहे. इंग्लंड क्रिकेट टीम या वर्ल्ड कप स्पर्धेतून ‘आऊट’ झाली आहे. इंग्लंडला या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी फक्त 1 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर नेदरलँड्सने 7 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला पराभूत करत उलटफेक केला आहे. त्यामुळे आता नेदरलँडसला पराभूत करत तिसऱ्यांदा उलटफेर करणार का, अशी चर्चाही क्रिकेट विश्वात रंगली आहे. दरम्यान हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार हे जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामना कधी?
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामना बुधवारी 8 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामना कुठे होणार?
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामना मोबाईलवर कुठे बघता येईल?
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामना मोबाईलवर फुकटात डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहता येईल.
इंग्लंड क्रिकेट टीम | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड, सॅम कुरन, ब्रायडन कार्स, हॅरी ब्रूक आणि गेस ऍटकिन्सन.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडॉड, कॉलिन एकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन, तेजा निदामनुरु, विक्रमजीत सिंह, रायेन क्लेईन आणि शरीझ अहमद.