ENG vs Pak, 1st T20I : इंग्लंड-पाकिस्तानला मागे टाकत पावसाची जोरदार ‘बॅटिंग’, पहिलाच सामना रद्द
England vs Pakistan 1st T20I: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांत्यातील टी 20 मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी 20 मालिकेतील पहिलाच सामना हा पावसामुळे रद्द झाला आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 आधी उभयसंघासाठी ही महत्त्वाची मालिका आहे. या पहिल्या सामन्याचं आयोजन हे हेडिंग्ले लीड्स येथे करण्यात आलं होतं. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार होती. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे नाईलाजाने सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली. उभयसंघात एकूण 4 सामन्यांची ही टी 20 मालिका होणार आहे. त्यापैकी आता 3 सामने शेष आहेत.
पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी ही मालिका फार महत्त्वपूर्ण आहे. कारण टी 20 वर्ल्ड कपसाठी संघात स्थान मिळवण्यासाठी या मालिकेतील कामगिरी निर्णायक ठरणार आहे. पाकिस्तानने अजूनही टी 20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर केलेला नाही. त्यामुळे या इंग्लंड विरुद्धच्या या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये पाकिस्तानचे खेळाडू जोरदारा कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसू शकतात. दरम्यान उभयसंघातील दुसरा सामना हा शनिवारी 25 मे रोजी बर्मिंगघम येथे होणार आहे.
टी 20 मालिकेतील उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक
दुसरा सामना, 25 मे, संध्याकाळी 7 वाजता, बर्मिंगघम.
तिसरा सामना, 28 मे, रात्री 11 वाजता, कार्डिफ.
चौथा सामना, 30 मे, रात्री 11 वाजता, लंडन.
इंग्लंड-पाकिस्तान पहिला सामना पावसामुळे वाया
Our first IT20 against Pakistan has been abandoned ❌
See you at Edgbaston, England fans 👋 pic.twitter.com/luw2mcUR4c
— England Cricket (@englandcricket) May 22, 2024
पाकिस्तान क्रिकेट टीम : बाबर आजम (कॅप्टन), सैम अयूब, मोहम्मद रिजवान, फखर जमान, आजम खान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन अफरीदी, नसीम शाह, अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, शादाब खान, उस्मान खान, हसन अली, हारिस रऊफ, आगा सलमान, अबरार अहमद आणि इरफान खान.
इंग्लंड क्रिकेट टीम : जोस बटलर (विकेटकीपर आणि कॅप्टन), फिल साल्ट, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रुक और बेन डकेट, मोईन अली, लियम लिविंग्सटन, विल जॅक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, क्रिस जोर्डन, रीस टॉपली, मार्क वुड, आदिल रशीद आणि टॉम हार्टले.