ENG vs NED | इंग्लंडच्या फिरकीपटूंनी गुंडाळलं, नेदरलँड्सवर 160 धावांनी विजय
England vs Netherlands | इंग्लंड क्रिकेट टीमला अखेर दुसरा वियज मिळाला आहे. इंग्लंडने नेदरलँड्सवर 160 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे.
पुणे | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील 40 वा सामना इंग्लंडने जिंकला आहे. इंग्लंडने त्यांच्या तुलनेत दुबळ्या नेदरलँड्सवर 160 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. इंग्लंडने नेदरलँड्सला विजयासाठी 340 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी नेदरलँड्सला गुंडाळलं. नेदरलँड्सला 50 ओव्हरही नीट खेळता आलं नाही. इंग्लंडने नेदरलँड्सला 37.2 ओव्हरमध्ये 179 धावांवर गुंडाळलं.
नेदरलँड्सची बॅटिंग
नेदरलँड्सकडून फक्त 5 जणांनाच दुहेरी आकडा गाठता आला. त्यापैकी तिघांनाचा तिशीपार मजल मारता आला. दोघे भोपळा न फोडता आले तसेच गेले. तर चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. नेदरलँड्सकडून तेजा निदामनारु याने सर्वाधिक नाबाद 41 धावांची खेळी केली. कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने 38, वेस्ली बॅरेसी याने 37 आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने 33 धावांचं योगदान दिलं. कॉलिन अकरमन आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वे या दोघांना खातंही उघडता आलं नाही. तर मॅक्स ओडोड 5, पॉल व्हॅन मीकरेन 4, लोगान व्हॅन बीक 2 आणि आर्यन दत्त 1 धावा करुन आऊट झाले.
इंग्लंड नवव्या क्रमांकावर
इंग्लंड क्रिकेट टीमने या विजयासह पॉइंट्स टेबलमधून दहाव्या स्थानावरुन नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. इंग्लंड आणि नेदरलँड्स आणि इंग्लंड दोन्ही संघांचे समसमान 4 पॉइंट्स आहेत. मात्र नेदरलँड्सच्या तुलनेत इंग्लंडचा नेट रनरेट चांगला असल्याने इंग्लंड नवव्या क्रमांकावर पोहचली आहे.
जिंकले बाबा एकदाचे दुसऱ्यांदा
🏴 Back to winning ways! 🏴
Well played, lads 👏 #EnglandCricket | #CWC23 pic.twitter.com/AGKtrhAo0U
— England Cricket (@englandcricket) November 8, 2023
दरम्यान इंग्लंड वर्ल्ड कप 2023 मधील आपला अखेरचा सामना हा पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. इंग्लंडसाठी हा सामना चॅम्पियन ट्रॉफीच्या हिशोबाने अतिशय महत्त्वाचा असा असणार आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गेस ऍटकिन्सन आणि आदिल रशीद.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.