पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि मैदानातच सुकवली अंडरवियर; मुल्तान कसोटीत काय चाललंय?

| Updated on: Oct 10, 2024 | 9:52 PM

इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना आकाश दाखवलं. झटपट विकेट घेण्याचा सर्वच प्लान फसला. इंग्लंडच्या विकेट काढताना पाकिस्तानी गोलंदाज गळून गेले. जो रूट आणि हॅरी ब्रूकने घामाने भरलेल्या अंगानेच सळो की पळो करून सोडली. दोघांनी मिळून 400 हून अधिक धावांची भागीदारी केली.

पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि मैदानातच सुकवली अंडरवियर; मुल्तान कसोटीत काय चाललंय?
Image Credit source: (PC-बार्मी आर्मी ट्विटर)
Follow us on

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला कोंडीत पकडलं. इंग्लंडने पहिल्या डावात 150 षटकांचा सामना करत 823 धावा केल्या. हॅरी ब्रूकने 317 आणि जो रूटने 262 धावांची खेळी केली. इंग्लंडने 7 गडी गमावल्यानंतर डाव घोषित केला आणि पहिल्या डावात 267 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा डाव संपल्यानंतर मैदानात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं.जो रुटने 375 चेंडूंचा सामना केला आमि 262 धावा केल्या. यावेळी त्याने 17 चौकार मारले. तर हॅरी ब्रूकसोबत 454 धावांची भागीदारी केली. इंग्लंड संघाकडून कसोटीतील सर्वात मोठी भागीदारी आहे. जो रूटने द्विशतकी खेळी केल्यानंतर मुल्तानच्या मैदानातच कपडे सुकायला लावले. घामाने भिजलेले कपडे सुकवण्यासाठी मैदानात टाकल्याने क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्का बसला. सीमारेषेजवळ जो रूटने कपडे सुकायला लावले होते.

जो रुटने पॅव्हेलियनजवळील सीमारेषेजवळ जो रूटने कपडे सुकवण्यासाठी लावले होते. यात त्याची जर्सी, ट्राउझल होती. इतकंच काय तर अंडरवियरही सुकायला मैदानात लावली होती. आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जो रुटचं पाकिस्तानविरुद्धचं शतक खूपच खास आहे. आशिया देशाबाहेरील खेळाडू म्हणून त्याने पाकिस्तान, श्रीलंका आणि भारताविरुद्ध द्विशतक ठोकलं आहे. जो रूटला यापूर्वी इंग्लंडमधला खेळाडू हिणवलं जात होतं. पण त्यानंतर त्याने दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, युएई, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानमध्ये 50हून अधिक सरासरीने धावा केल्या. भारतात त्याने 45हून अधिक सरासरीने धावा केल्या आहेत.

जो रूटचं हे सहावं द्विशतक आहे. द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातवं स्थान मिळवून सचिन तेंडुलकरच्या बरोबरीत बसला आहे. इंग्लंडसाठी कसोटीत 12500+ धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे.द्विशतकासह रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला.