मॅच आहे की हायलाईट! Video पाहून तुम्हीही तसंच म्हणाल, फक्त 43 चेंडूत ठोकल्या 193 धावा

| Updated on: Dec 07, 2023 | 7:12 PM

क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक वादळी खेळींचं दर्शन झालं आहे. जयसूर्या, गिलख्रिस्ट, हेडन, सेहवाग, ख्रिस गेल एकदा का मैदानात आले की षटकार आणि चौकारांचा वर्षाव व्हायचा. आता क्रिकेट खूपच फास्ट झालं आहे. त्यामुळे न भूतो पण भविष्यती असे अनेक विक्रम पाहायला मिळत आहे. यात 43 चेंडूत 193 धावांची खेळी चर्चेत आहे.

मॅच आहे की हायलाईट! Video पाहून तुम्हीही तसंच म्हणाल, फक्त 43 चेंडूत ठोकल्या 193 धावा
Video : चौकार आणि षटकरांची आतषबाजी! 43 चेंडूत 193 धावांची वादळी खेळी
Follow us on

मुंबई : क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम सुवर्ण अक्षराने नोंदवले गेले आहेत. एका पेक्षा एक सरस असे विक्रम आहेत. काही विक्रम तर वर्षानुवर्षे अबाधित आहे. हे विक्रम मोडणं कोणालाही शक्य नाही. पण भविष्यात क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं यात शंका नाही. एक दिवस असाही येईल की सहा चेंडूत सहा विकेट घेतल्या असतील. आता खोट्या वाटणाऱ्या कल्पना कदाचित भविष्यात खऱ्या ठरू शकतात. आता हेच बघाना 10 षटकांच्या सामन्यात एका खेळाडूने 193 धावांची खेळी केली असं सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे खरंच घडलं आहे. एका खेळाडूने 43 चेंडूत 193 धावांची खेळी केली. ही खेळी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीच अशी खेळी खेळली गेली नाही. फार फार तर 43 चेंडूत शतक वगैरे ठोकल्याचं ऐकिवात असेल. पण 193 धावांची खेळी म्हणजे एखादं स्वप्न असल्यासारखंच आहे.

युरोपियन क्रिकेटमध्ये कॅटालुनिया जग्वॉर आणि सोहल हॉस्पिटेलेट यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात कोणी बाजी मारली? हा प्रश्नच येत नाही. ज्या संघातील खेळाडूने 193 धावा केल्या तोच संघ जिंकणार यात शंका नाही. कॅटालुनिया जॅग्वॉरचा सलामीचा फलंदाजी हामजा सलीम डार याने ही किमया केली आहे. त्याने 44.84 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. त्याने 43 चेंडूत म्हणजेच 7.1 षटकात 193 धावा केल्या. हा विक्रम आता सुवर्ण अक्षरात नोंदवला गेला आहे.

हाजमा सलीम डारने 43 चेंडूत 22 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 193 धावा केल्या. हाजमाच्या नाबाद खेळीमुळे सोहल हॉस्पिटेलेटला 257 धावांचं आव्हान मिळालं. हमजा दारने 193 आणि यासिर अलीने 58 नाबाद खेळी केली. यासिर अलीनेही 19 चेंडूत 7 षटकार 3 चौकाराच्या मदतीने 58 धावा केल्या. एका षटकात तर 43 धावा आल्या. सोहल हॉस्पिटेलेट संघाला 10 षटकात 104 धावा करता आल्या.

  • पहिलं षटक : 4,4,4,6,6,0
  • दुसरं षटक : 0,1,4,4,7nb,4,6
  • तिसरं षटक : 1W,6,1,4,4,6,1
  • चौथं षटक : 6,1,6,0,0,6
  • पाचवं षटक : 6,6,1,0,4,6
  • सहावं षटक : 6,6,1,4,6,1wd,4
  • सातवं षटक : 4,4,6,6,4,6
  • आठवं षटक : 1,6,1,6,0,6
  • नववं षटक : 4,7nb,1wd,1wd,6,6,6,6,6
  • दहावं षटक : 1,6,4,6,0,4