टी20 वर्ल्डकपपूर्वी सुनील गावस्कर यांचं ऋषभ पंतबाबत मोठं वक्तव्य, काहीही झालं तरी…!

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा तोंडावर असून तयारीसाठी अवघे चार महिने शिल्लक आहे. अफगाणिस्तानविरुद्धची मालिका आणि आयपीएल 2024 स्पर्धा तयारीसाठी आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंतबाबत मोठं वक्तव्य केल आहे. तसेच निवडसमितीला सल्लाही दिला आहे.

टी20 वर्ल्डकपपूर्वी सुनील गावस्कर यांचं ऋषभ पंतबाबत मोठं वक्तव्य, काहीही झालं तरी...!
टी20 वर्ल्डकपपूर्वी सुनील गावस्कर यांचा निवड समितीला डोस! ऋषभ पंतबाबत सांगितलं असं काही
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 2:05 PM

मुंबई : टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार असून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचंही टी20 मध्ये कमबॅक झालं आहे. तर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरत आहेत. असं असताना आता एक नाव चर्चेत आलं आहे ते म्हणजे ऋषभ पंत..ऋषभ पंत गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर आहे. अपघातात जखमी झाल्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर एनसीएमध्ये रिकव्हरीसाठी त्याने बऱ्यापैकी घाम गाळला. आता आयपीएल 2024 स्पर्धेत खेळताना दिसू शकतो. ऋषभ पंतची मागच्या काही इनिंग पाहता तो टीम इंडियासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. असं असताना त्याने टी20 वर्ल्डकपसाठी संघात पुनरागमन करावं यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंतबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. वर्ल्डकप संघात ऋषभ पंतची गरज असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे.

सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, ‘मी केएल राहुलला विकेटकीपर म्हणून पाहू इच्छितो. पण मी याकडेही लक्ष वेधू इच्छितो की, ऋषभ पंत एका पायावर खेळण्यास सक्षम असेल तर त्याला संधी दिली पाहीजे. तो क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मेटमध्ये गेमचेंजर आहे. मी जर सिलेक्टर असतो तर त्याचं नाव पहिलं घेतलं असतं.’ ऋषभ पंत अपघातानंतर बऱ्यापैकी सावरला आहे. त्याचं कमबॅक कसं असेल याची उत्सुकता लागून आहे. तो तसाच पूर्वीसारखा खेळेल का? याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

ऋषभ पंत आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसेल. मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंच्या निवडीसाठी तो मॅनेजमेंटसोबत दिसला होता. ऋषभ पंत विकेटकीपिंग करणार की नाही याबाबत शंका आहे. यावर गावस्कर यांनी सांगितलं की, “तसं पाहिलं तर ऋषभ पंत उपलब्ध नाही आणि केएल राहुल विकेटकीपिंग करेल. पण दोघंही असतील टीम चांगली असेल. तुमच्याकडे ओपनिंग आणि मधल्या फळीत घेण्यासाठी पर्याय असेल. संघासाठी फिनिशरचं काम करेल.”

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.