Rohit Sharma | सगळे रोहितच्या विरोधात बोलतायत, फक्त एका दिग्गज क्रिकेटरने डोळ्यांना न दिसणारं वास्तव दाखवलं

| Updated on: Jun 20, 2023 | 1:07 PM

Rohit Sharma | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया हरल्याच दु:ख सगळ्यांच्या मनात आहे. त्यासाठी कॅप्टन रोहित शर्माला जबाबदार धरलं जातय. पण त्याचवेळी एका गोष्टीचा सगळ्यांना विसर पडलाय.

Rohit Sharma | सगळे रोहितच्या विरोधात बोलतायत, फक्त एका दिग्गज क्रिकेटरने डोळ्यांना न दिसणारं वास्तव दाखवलं
Rohit Sharma
Image Credit source: AFP
Follow us on

सिडनी : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रोहितच्या टीम इंडियाने खूप खराब कामगिरी केली. पॅट कमिन्सने रोहित शर्माच्या टीमवर एकतर्फी 209 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियान WTC च पहिलं विजेतेपद पटकावलं. टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 10 वर्षापूर्वी ICC ट्रॉफी जिंकली होती. आता वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करते, त्यावर रोहित शर्माचा कॅप्टन म्हणून भवितव्य अवलंबून आहे.

WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मायकल क्लार्क रेव स्पोर्ट्झशी बोलत होता. मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन आहे. त्याने रोहितच्या कॅप्टनशिपबद्दल मत व्यक्त केलं.

लीडर म्हणून तो यशस्वी

रोहितवर विश्वास दाखवा, अशी मी भारतीय थिंक-टँकला विनंती करेन, असं क्लार्क म्हणाला. “मी रोहितवर विश्वास दाखवेन. तो खूप चांगला कॅप्टन आहे. त्याचा आक्रमक अप्रोच मला आवडतो. तो शक्य तितका सकारात्मक दिसतो. लीडर म्हणून त्याने यश मिळवलय. तुम्ही मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून त्याचा आयपीएलमधील त्याचा रेकॉर्ड बघा” असं क्लार्क म्हणाला.

स्थिरता आवश्यक

“भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा किताब जिंकला नाही, म्हणून रोहित टीम इंडियाच नेतृत्व करण्यासाठी योग्य नाही असं म्हणता येणार नाही. सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचणारी टीम इंडिया एकमेव संघ आहे. यातून मागची चार वर्ष ते कसं कसोटी क्रिकेट खेळले हे लक्षात येतं. वनडे वर्ल्ड कप जवळ येतोय, त्यामुळे स्थिरता आवश्यक आहे” असं क्लार्क म्हणाला.

या गोष्टी लक्षात आणून दिल्या

“रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडेच राखली. फलंदाज म्हणून सुद्धा रोहितने चांगली कामगिरी केलीय. एखाद दुसरी फायनल गमावली म्हणून रोहित वाईट कॅप्टन ठरत नाही किंवा टीम इंडिया खराब आहे असा अर्थ होत नाही. सलग दोनदा फायनल गाठण सोपं नाहीय. याचाच अर्थ चार वर्षापासून टीम इंडिया सातत्यपूर्ण क्रिकेट खेळतेय” असं क्लार्क म्हणाला.