सचिन अन् मी सोबतच आशीर्वाद घेण्यासाठी जायचो, पण आचरेकर सर…, विनोद कांबळीचा मोठा खुलासा, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

माजी क्रिकेटर विनोद कांबळी सध्या चांगलाच चर्चेमध्ये आहे. त्याचा सचिनसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तो चर्चेत आला. दरम्यान त्याने आपले कोच रमाकांत आचरेकरांबदद्ल एक जुणी आठवण सांगितली आहे.

सचिन अन् मी सोबतच आशीर्वाद घेण्यासाठी जायचो, पण आचरेकर सर…, विनोद कांबळीचा मोठा खुलासा, 'तो' व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 3:09 PM

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या दोन दिग्गज क्रिकेटपटूंचा एक व्हिडीओ काही दिवासंपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा विनोद कांबळी चर्चेत आला आहे. ज्यांनी सचिन आणि विनोद कांबळी यांना घडवलं असे महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाच्या अनावरणानिमित्त विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या दोन क्रिकेटपटू आणि लहानपणीच्या मित्रांची भेट झाली, त्यावेळचा हा व्हिडीओ आहे.

आचरेकर सारांच्या स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमात विनोद कांबळी जिथे बसला होता, तिथे त्याच्या दिशेनं सचिन गेला. तेव्हा विनोद कांबळीने आपल्या बालपणीच्या मित्राला उभं राहुन मिठी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला नीट उभं राहाताही येत नव्हतं. त्यानंतर कांबळीने आचरेकर सरांच्या आठवणीत एक गाणं देखील गायलं, मात्र गाताना देखील तो अडखळत होता. या व्हिडीओने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अनेकजण विनोद कांबळीच्या मदतीला धावून आले आहेत.

दरम्यान विनोद कांबळीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका वृत्त वाहिनिला दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये विनोद कांबळी याने आपल्या पूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी बोलताना त्याने आपले प्रशिक्षक कमाकांत आचरेकर सरांबाबत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की कुठेही आमचा सामना असायचा त्यावेळी आम्ही मी आणि सचिन पहिल्यांदा रमाकांत आचरेकर सरांचा आर्शीवाद घेण्यासाठी जायचो. मात्र रमाकांत आचरेकर सर आम्हाला कधीही बेस्ट ऑफ लक म्हटले नाहीत, किंवा जेव्हा आम्ही खूप चांगला खेळ करायचो तेव्हा ते कधीही आम्हाला वेल प्लेड देखील म्हटले नाहीत, असा खुलासा विनोद कांबळी याने या व्हिडीओमध्ये केला आहे.

दरम्यान कांबळीची अशी अवस्था बघून आता त्याच्या मदतीसाठी  दिग्गज क्रिकेटपटू लिटिल मास्ट अर्थात सुनील गावसकर धावून आले आहेत. कांबळी हा मला माझ्या मुलासारखा आहे.  आमची 1983 ची टीम त्याची काळजी घेणार आहे. आम्ही त्याला पुन्हा एकदा त्याच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करू, असं गावसकर यांनी म्हटलं आहे.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.