INDvsAUS | तिसऱ्या कसोटीला Rishabh Pantची उपस्थिती? व्हीडिओ व्हायरल
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत उपस्थितीत आहे असा दावा करणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंदूर | बॉर्डर गावसकर ट्रॉफीत टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसरा कसोटी सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या 2 दिवसांचा खेळ संपला आहे. तर ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी तिसऱ्या दिवशी 76 धावांची गरज आहे. टीम इंडियाला पराभवाचा धोका आहे. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
इंदूरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात आला असल्याचा दावा करण्यात येतोय. तसा व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऋषभ पंत याचा डिसेंबर 2022 मध्ये कार अपघात झाला होता. तेव्हापासून पंत हा क्रिकेटपासून दूर आहे.
व्हायरल व्हीडिओ हा @ArunTuThikHoGya या ट्विटर हँडलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हीडिओ आतापर्यंत 11 हजारपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय. या व्हीडिओत दिसणाऱ्या तरुणाची दाढी ही ऋषभ पंतसारखी आहे. मात्र व्हीडिओत दिसणारा तरुण हा पंत नाही. त्यामुळे ऋषभ पंत इंदूर कसोटीमध्ये उपस्थित असल्याचा दावा खोटा आहे.
व्हायरल व्हीडिओ
Rishabh pant INDvAUS match dekhne aaya hai? pic.twitter.com/W6sLEe2KNx
— Arun Singh (@ArunTuThikHoGya) March 2, 2023
पंत हळूहळू सावरतोय
दरम्यान पंत हळुहळु सावरतोय. पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी उत्तराखंडला आपल्या घरी जाताना कार अपघात झाला होता. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार ही थेट डिव्हायडरला जाऊन धडकली होती. त्यानंतर गाडीने पेट घेतला होता.
नक्की काय झालं होतं?
पंत दिल्लीवरुन रुडकीला आपल्या राहत्या घरी आईला सरप्राईज द्यायला जात होता. या दरम्यान दिल्ली-देहरादून हायवेवर गाडी डिव्हायडरला धडकली. त्यानंतर गाडीने पेट घेतला. मात्र त्याआधीच पंत गाडीबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातानंतर पंतवर देहरादूनमध्ये 6 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं.
त्यानंतर पंतला पुढील उपचारांसाठी मुंबईत शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर पंतवर दिनशॉ पारदीवाला यांच्या निगरानीखाली उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर पंतला डिस्चार्ज देण्यात आला. आता पंत सध्या डेली रुटीन फॉलो करतोय.
दरम्यान ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटीत विजयासाठी तिसऱ्या दिवशी 76 धावांचं आव्हान आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून विजयी खातं उघडतं की टीम इंडियाचे गोलंदाज कारनामा करतात, याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असेल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेन, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.