Tushar Deshpande कडून आरसीबीला डिवचण्याचा प्रयत्न! इंस्टा स्टोरीद्वारे सीएसकेला पराभूत केल्याचा असा वचपा?

Tushar Deshpande : राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला. आरसीबीच्या पराभवानंतर तुषार देशपांडे या नावाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी व्हायरल झाली आहे. ही स्टोरी सीएसकेचा गोलंदाज तुषार देशपांडे याने केल्याचा दावा केला जात आहे.

Tushar Deshpande कडून आरसीबीला डिवचण्याचा प्रयत्न! इंस्टा स्टोरीद्वारे सीएसकेला पराभूत केल्याचा असा वचपा?
csk tushar deshapande and rcb virat kohli iplImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: May 23, 2024 | 3:21 AM

राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात सलग 6 सामने जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजय रथ रोखला. आरसीबीचं पराभवासह या हंगामातून पॅकअप झालं. त्यांतर चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे सोशल मीडियावर ट्रेंड झाला आहे. राजस्थानने 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला. त्यानंतर तुषार देशपांडेची इंस्टा स्टोरी चर्चेचा विषय ठरली आहे. तुषारने इंस्टा स्टोरीतून आरसीबीची थट्टा उडवली आहे. सोशल मीडियावर तुषार देशपांडे या नावासह इंस्टा स्टोरी व्हायरल होत आहे. हा तुषार देशपांडे सीएसकेचा गोलंदाज असल्याचा दावा केला जात आहे. तसेच तुषारने इंस्टा स्टोरी व्हायरल झाल्यानंतर डिलीट केल्याचा दावाही केला जात आहे. तुषारच्या इंस्टा अकाउंटवर आरसीबी संबंधित स्टोरी किंवा पोस्ट दिसत नाहीय. आरसीबीने चेन्नईला नेट रनरेटच्या आवश्यक फरकाने पराभूत करत मोक्याच्या क्षणी प्लेऑफमध्ये धडक मारली होती.

व्हायरल इंस्टा स्टोरीत नक्की काय?

तुषार देशपांडेच्या नावाने व्हायल झालेल्या इंस्टा स्टोरीत बंगळुरुती छावनी रेल्वे स्थानकाचा फोटो आहे. या फोटोत ‘Bengaluru CANT.’, असं लिहिलं आहे. या CANT चा अर्थ असा की आरसीबी आयपीएल ट्रॉफी जिंकू शकत नाही. ही पोस्ट सीएसकेच फॅन्स ऑफिशियल पेजवरुन करण्यात आली आहे. “काही नाही बंगळुरुतील एक रेल्वे स्थानक”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तुषारने हीच पोस्ट इंस्टा स्टोरीवरुन पोस्ट केली. मात्र वादाला तोंड फुटु नये म्हणून तुषारने ही स्टोरी डिलीट केल्याचंही म्हटलं जात आहे.

तुषार आणि सीएसके

दरम्यान कल्याणकर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सकडून 2022 पासून खेळतोय. तुषारला 20 लाख या बेस प्राईजमध्ये सीएसकेने आपल्या ताफ्यात घेतलं. तुषारने तेव्हापासून ते आतापर्यंत 36 सामन्यांमध्ये 42 विके्ट घेतल्या आहेत. त्याआधी तुषार 2020 मध्ये दिल्लीच्या गोटात होता.

व्हायरल इंस्टा पोस्ट

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन: यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकटेकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.