IPL 2024 : रोहित शर्मा हार्दिकच्या कॅप्टन्सीला वैतागून मुंबईची साथ सोडणार?

Rohit Sharma Mumbai Indians : हार्दिक पंड्या याला कर्णधार केल्याने रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार? जाणून घ्या.

IPL 2024 : रोहित शर्मा हार्दिकच्या कॅप्टन्सीला वैतागून मुंबईची साथ सोडणार?
hardik and rohit ipl mumbai indiansImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 8:44 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्या याला कॅप्टन केलं. तेव्हापासून मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यात मुंबई इंडियन्सला हार्दिक पंड्या याच्या नेतृ्त्वात मुंबईला 3 सामने गमवावे लागले आहेत. या 3 पराभवांमुळे हार्दिकवरचा रोष आणखी वाढला आहे. त्यात आता एका रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससह नाराज असल्याच म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर या 17 व्या हंगामानंतर रोहित शर्मा मुंबईची साथ सोडणार असल्याच्याही चर्चा आहेत. मुंबईने हार्दिकच्या कॅप्टन्सीत अहमदाबाद, हैदराबाद आणि मुंबईत असे 3 सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात क्रिकेट चाहत्यांनी कॅप्टन हार्दिकला जोरदार ट्रोल केला.

रोहित मुंबईची साथ सोडणार?

रोहित शर्मा आयपीएलच्या 17 व्या हंगामानंतर मु्ंबईची साथ सोडू शकतो. रोहित हार्दिकच्या कॅप्टन्सीवर नाखूश आहे, असं News 24 च्या वृत्तात म्हटलंय. रोहित शर्मा आणि हार्दिक सिनिअर खेळाडू आहेत. रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन केलंय. तर दुसऱ्या बाजूला हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईला विजयाचं खातंही उघडता आलेलं नाही. रोहितला क्रिकेटचा आणि कर्णधारपदाचा तगडा अनुभव आहे. मात्र आता हार्दिक मुंबईचा कॅप्टन असल्याने निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे हार्दिकला आहेत. त्यामुळे या दोघांच्या अनुभवाचा उपयोग मुंबईच्या विजयात होताना तरी दिसत नाहीय.

रोहितला पुन्हा कॅप्टन्सी मिळणार?

News 24 च्या वृत्तानुसार, रोहितला पुन्हा कर्णधार करण्याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र याआधी कॅप्टन हार्दिकला कामगिरी सुधारण्यासाठी 2 सामन्यांचा वेळ दिला जाऊ शकतो. मात्र या सर्व चर्चा आहेत. याबाबत कोणत्याही बाबतीत अधिकृत माहिती नाही.

रोहित मुंबईची साथ सोडणार असल्याची चर्चा

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.