RCB New Captain : Faf Du Plessis रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा नवीन कर्णधार, IPL 2022 पासून जबाबदारी घेणार
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Royal Challengers Bangalore) आयपीएल 2022 (IPL 2022) पूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. फाफ डू प्लेसिसची (Faf Du Plessis) आरसीबीच्या नवीन कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (Royal Challengers Bangalore) आयपीएल 2022 (IPL 2022) पूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. फाफ डू प्लेसिसची (Faf Du Plessis) आरसीबीच्या नवीन कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने विराट कोहलीची जागा घेतली आहे. फाफ डु प्लेसिस हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू आहे. तो बराच काळ आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग राहिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार म्हणून IPL-2021 हा त्याचा शेवटचा हंगाम असल्याचे विराट कोहलीने गेल्या वर्षी जाहीर केले होते. आयपीएल 2021 दरम्यान त्याने कर्णधारपद सोडले. 2013 पासून विराट कोहली या संघाचे नेतृत्व करत होता. यंदाच्या मोसमात आरसीबी कोणाला कर्णधार बनवणार याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. त्याचं उत्तर आज मिळालं आहे.
महा लिलावात आरसीबीने त्याला 7 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. त्याला चेन्नईने आयपीएल-2022 साठी संघात कायम ठेवले नाही. डु प्लेसिसने याआधी दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे. अशा स्थितीत तो आरसीबीचा नवा कर्णधार होऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात होती. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याच्याशिवाय ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक यांच्या नावाचाही आरबीसीच्या नव्या कर्णधारपदाच्या शर्यतीत विचार केला जात होता. फाफ डू प्लेसिससमोर जेतेपद पटकावण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. आरसीबीने तीनदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे, मात्र त्यांना कधीही विजेतेपद पटकावता आलेले नाही.
The Leader of the Pride is here!
Captain of RCB, @faf1307! ?#PlayBold #RCBCaptain #RCBUnbox #ForOur12thMan #UnboxTheBold pic.twitter.com/UfmrHBrZcb
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 12, 2022
डू प्लेसिस पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळणार
आयपीएलमध्ये फॅफ डू प्लेसिस एखाद्या संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ असेल. तसेच, पहिल्यांदाच तो एमएस धोनीशिवाय खेळताना दिसणार आहे. तो 2012 पासून आयपीएलचा भाग आहे. 2016 आणि 2017 मध्ये चेन्नई संघाला निलंबित करण्यात आले तेव्हा तो रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा भाग होता. धोनीही या संघाकडून खेळला. त्याने आयपीएलमध्ये 100 सामने खेळले असून 34.94 च्या सरासरीने 2935 धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 22 अर्धशतके झळकावली आहेत.
“Happy to pass on the baton to Faf! Excited to partner with him and play under him” – A message from @imVkohli for our new captain @faf1307. ?#PlayBold #RCBUnbox #UnboxTheBold #ForOur12thMan #IPL2022 pic.twitter.com/lHMClDAZox
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 12, 2022