IPL 2023 : सीएसकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, माहीचा ‘तो’ हुकमी एक्का परतला रे!

| Updated on: Feb 22, 2023 | 5:31 PM

काईल जेमीसन दुखापती असल्यामुळे यंदाच्या आयपीलमध्ये तो खेळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. अशातच सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हुकमी एक्का असलेला मॅचविनर खेळाडू परतला आहे.

IPL 2023 : सीएसकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, माहीचा तो हुकमी एक्का परतला रे!
CSK
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक समोर आलं आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काईल जेमीसन दुखापती असल्यामुळे यंदाच्या आयपीलमध्ये तो खेळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. जेमीसनला चेन्नईने घेतलं होतं मात्र दुखापत झाल्याने त्याची जागा कोण घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हुकमी एक्का असलेला मॅचविनर खेळाडू परतला आहे.

महेंद्रसिंह धोनीचा हुकमी असलेला हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही तर दीपक चहर आहे. धोनीने त्याला सुरूवातीच्या ओव्हर्समध्ये बॉलिंग दिली आणि दीपकनेही या संधीचं सोन करत माहीचा विश्वास जिंकला. चेन्नईचा हा स्ट्राईक बॉलर दीपक चहर दुखापतीमुळे गेली दोन वर्षे दुखापतीने त्रासला आहे.

2022 मध्ये चहर भारतासाठी फक्त 15 सामने खेळला, इतकंच नाहीतर भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली होती. आयपीएलच्या पॉवरप्लेमध्ये विरोधी संघाच्या सुरूवातीच्या विकेट्स दीपक घेत होता. भारताकडून शेवटचा बांगलादेशमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळला होता जिथे तो फक्त तीन षटके टाकू शकला होता.

गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेत आहे. आता पूर्णपणे तंदुरुस्त असून आयपीएलसाठी चांगली तयारी करत आहे. मला दोन मोठ्या दुखापती झाल्या होत्या, यातील एकात माझी सर्जरीही झाली. दुखापतीनंतर पुनरागमन करण्यास वेळ लागतो महत्त्वाचं म्हणजे एक वेगवान गोलंदाजाला कमबॅक करणं मोठं आव्हान असतं, असं दीपक चहर म्हणाला.

मी एक बॅट्समन असतो तर अधिक काळ खेळलो असतो. मात्र वेगवान गोलंदाज म्हणून तुम्हाला पुनरागमन करणं कठीण असतं. तुम्ही पाहू शकता की काही गोलंदाज पाठीच्या आणि मांडीच्या दुखापतींचा सामना करत आहेत, असंही चहरने सांगितलं.

दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये दीपक चहरच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. कारण जर दीपकने चमकदार कामगिरी केली तर त्याला आगामी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्येही स्थान मिळू शकतं. दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्सने 14 कोटींना विकत घेतलं होतं. आयपीएलच्या कारकिर्दीत दीपकने आतापर्यंत 63 सामन्यात 59 विकेट घेतल्या आहेत.