Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियात मोठा बदल! वॉशिंग्टननंतर दुसऱ्या खेळाडूची एन्ट्री

न्यूझीलंडने भारताला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने पाणी पाजलं आहे. न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच मालिका जिंकून भारताच्या आशेवर पाणी सोडलं आहे. असं असताना तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियात काही बदल होण्याची शक्यता आहे. तिसरा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईत खेळला जाणार आहे.

IND vs NZ : तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियात मोठा बदल! वॉशिंग्टननंतर दुसऱ्या खेळाडूची एन्ट्री
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 4:45 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. खरं तर तिसऱ्या सामन्यातही न्यूझीलंडचं पारडं जड आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय वाटतो तितका सोपा नाही, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरची एन्ट्री झाली होती. आता सलग दोन पराभवानंतर तिसऱ्या कसोटीत आणखी एक बदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला स्क्वॉडमध्ये सहभागी केलं आहे. त्यामुळे मुंबई कसोटीत पदार्पण करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिसऱ्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराहला आराम दिला जाण्याची चर्चा रंगली आहे. पण याबाबत अधिकृत असं काहीच समोर आलेलं नाही. दुसरीकडे, हर्षित राणा सध्या फॉर्मात आहे. इतकंच काय तर त्याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी संघात स्थानही मिळालं आहे. हर्षित राणा फक्त 22 वर्षांचा असून त्याला इतक्या कमी वयात संघात स्थान मिळालं आहे.

हर्षितने नुकतंच आसाम विरूद्धच्या सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. तसेच फलंदाजीतही दम दाखवत अर्धशतक ठोकलं आहे. त्यामुळे गोलंदाजी आणि फलंदाजी पाहता त्याला संघात सहभागी करून घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत हर्षित राणा हुकूमाचं पान ठरू शकतो, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. हर्षित राणा आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये 9 फर्स्ट क्लास सामने खेळला असून 36 विकेट घेतल्या आहे. एका डावात पाच विकेट घेण्याचा कारनामाही केला आहे. या व्यतिरिक्त एका सामन्यात 10 विकेट घेण्याची किमया साधली आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हर्षितने 41 च्या सरासरीने 410 धावाही केल्या आहेत.

दरम्यान, हर्षित राणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार की नाही? याबाबत स्पष्टता नाही. पण मुंबई कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. जर तसं झालं तर त्याचा पर्याय म्हणून हर्षित राणाला संधी मिळू शकते. दुसरीकडे, मोहम्मद सिराजही वेटिंगवर आहे. पुणे कसोटीत त्याला आराम दिला होता. हर्षितची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी केली आहे. तत्पूर्वी न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळून एक अनुभव गाठीशी बांधू शकतो.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.